आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. गुल्हानेंसह कनिष्ठ लिपिक निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र गुल्हाने क्रीडा विभागातील कनिष्ठ लिपीक प्रशांत पवार यांना निलंबीत करुन मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी गुरुवारी मोठा झटका दिला. तडकाफडकी केल्या गेलेल्या या कारवाईमुळे मनपाचे अधिकारी-कर्मचारी धास्तावले असून कामचुकार आणि भ्रष्ट अधिकारी-कर्मचार्‍यांची गय नाही, हे स्पष्ट झाले आहे. नजिकच्या भविष्यात आणखी काही अधिकारी-कर्मचार्‍यांवर अशाप्रकारची कारवाई केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

डॉ. गुल्हाने यांच्यावर मनपाची आर्थिकदृष्ट्या फसवणूक तर पवार यांच्यावर कार्यालयीन कामात निष्काळजी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर दोघांनाही तत्काळ कामकाज बंद करायला सांगण्यात आले असून शहराच्या साफ-सफाईच्यादृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या आरोग्य अधिकार्‍याच्या कार्यभार दुसर्‍या अधिकार्‍याकडे सोपविण्यात आला आहे.

डॉ. श्यामसुंदर सोनी यांच्याकडे प्रभार
डॉ.देवेंद्र गुल्हाने यांच्या निलंबनानंतर त्यांचा प्रभार वैद्यकीय विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर सोनी यांच्याकडे देण्यात आला आहे. शहराच्या साफ-सफाईच्या दृष्टीने स्वच्छता विभागातील आरोग्य अधिकार्‍याचे पद महत्वपूर्ण आहे. त्यामुळे शुक्रवारपासून डॉ. गुल्हाने यांच्याकडील सूत्रे डॉ. सोनी सांभाळतील.

विभागीय चौकशी आरंभली
दोन्हीअधिकारी-कर्मचार्‍यांचे निलंबन केल्यानंतर आयुक्त गुडेवार यांनी त्यांची िवभागीय चौकशी (डीई) सुरु केली आहे. डॉ. गुल्हाने यांच्या चौकशीसाठी सप्टेंबर २०१४ ते मार्च २०१५ या काळातील कंत्राटदारांची सर्व देयके, नगरसेवकांची पत्रे, नागरिकांच्या स्वाक्षरी असलेले रिमार्क्स आदी साहित्य आरोग्य िवभागातूनमागवून चौकशी अधिकार्‍याकडे सोपविण्यात आले आहे.

चुका अक्षम्य म्हणूनच केले निलंबन
मनपाकायद्यानुसार प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. स्वच्छता विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र गुल्हाने यांनी कंत्राटदारांच्या देयकांच्या फाईलकडे दुर्लक्ष केले. क्रीडा विभागाच्या प्रशांत पवार यांनीही वरिष्ठांचे निर्देश अव्हेरले. त्यामुळे दोघांचेही निलंबन करण्यात आल्याची चर्चा आहे.

पुढे काय होणार ?
निलंबन आदेश बजावल्यानंतर सुरु करण्यात आलेल्या डीईमध्ये डॉ. देवेंद्र गुल्हाने प्रशांत पवार यांची विस्तृत चौकशी केली जाईल. त्या चौकशीत त्यांचे संपूर्ण कारनामे उघड होणार असून त्याआधारे आणखी नव्या कारवाईचा िनर्णय घेतला जाईल. प्रकरण फार गंभीर असले तर पोलिसात दिले जाईल.
बातम्या आणखी आहेत...