आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचेच आरोग्य धोक्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मनपाच्या इमारतीतील स्वच्छतागृहांची बकाल अवस्था झाल्याने अधिकारी-कर्मचार्‍यांची कुचंबणा, तर येथे येणार्‍या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. इमारत दुरुस्तीसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात लाखोंची तरतूद केली जात असूनही मनपाच्या बांधकाम विभागाचे ‘स्वगृहा’च्या अस्वच्छतेकडे दुर्लक्ष कायम आहे.
बांधकाम कार्यालयाला लागूनच असलेल्या स्वच्छतागृहाची स्थिती वाईट आहे. बहुतांश अधिकारी-कर्मचार्‍यांना याच स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. सुविधा केंद्राच्या बाजूला असलेल्या स्वच्छतागृहाचा नागरिकांसह कर्मचारीदेखील वापर करतात. त्याही स्वच्छतागृहाची अवस्था वेगळी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या बाजूचे स्वच्छतागृहदेखील मागील अनेक दिवसांपासून दुरुस्तच झाले नाही. प्रशासकीय इमारतीमधील सर्वच स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय झाली आहे. नगरसेवक, अधिकारी, कर्मचार्‍यांना नाक दाबून या गलिच्छ स्वच्छतागृहांचा वापर करावा लागतो. इमारत दुरुस्ती या शीर्षाखाली अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाते. प्रत्यक्षात त्याचा वापर योग्य ठिकाणी होत नसल्याचे यावरून स्पष्ट होते. मनपामध्ये ही स्थिती असेल, तर अन्य झोन कार्यालय, शाळा, शहराची काय स्थिती असेल, याची कल्पनाच केलेली बरी.