आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्कालीन एडीटीपीची चौकशी करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेतील तत्कालीन सहायक संचालक नगर रचना अधिकारी गिरीश आगरकर यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी रिपाइंचे (आठवले गट) नगरसेवक प्रा. प्रदीप दंदे व भूषण बनसोड यांनी केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत विभागातील एकाही फाइलवर स्वाक्षरी न करण्याबाबत आयुक्त अरुण डोंगरे यांना पत्र देण्यात आले आहे.
सहायक संचालक नगर रचना अधिकारी गिरीश आगरकर यांच्याकडून प्रभार काढून घेण्यात आला होता. त्यानंतर नगर रचना उपसंचालक कार्यालयातील व्ही. बी. शिंदे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला होता. मात्र, महापालिका प्रशासनाने त्यांना रुजूच करून घेतले नसल्याची बाब उघड झाली. यादरम्यान गिरीश आगरकर यांना परत आणण्याच्या हालचालीही झाल्यात. मनपातील एका बड्या पदाधिकार्‍याने आणि सत्तापक्षातील गटनेत्याने आगरकर यांना परत आणण्यासाठी आयुक्तांना पत्र दिल्याची बाबदेखील समोर आली होती. त्यानंतर काही दिवस एडीटीपी आगरकर मनपामध्ये अवतरले. मात्र, शासनाकडून नियमित अधिकारी पाठवण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाले.
भूसंपादन कार्यात निष्णात असलेल्या अधिकार्‍याला शासनाकडून सहायक संचालक नगर रचना अधिकारी म्हणून पाठवले आहे. असे असले तरी आगरकर यांचा प्रभार काढून घेणे आणि पुन्हा परत येणे या दरम्यान निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांवर प्रा. दंदे यांनी बोट ठेवले आहे. आगरकर पदावर असताना त्यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. 2012 पासून मनपाचे जवळपास 64 आरक्षण निकाली काढण्यात आले. त्यामध्ये त्यांचा मोठा असल्याचे प्रा. दंदे यांच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. शहरात खुले मैदान, बगिचे राहणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तत्कालीन एडीटीपी आगरकर यांची चौकशी करीत यादरम्यान निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांची चौकशी सीबीआयकडून करणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.