आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापार्‍यांनी उधळली महापालिकेची बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-एलबीटी, जकात या दोन्ही करप्रणालीचा विरोध करीत महापौरांनी गुरुवारी बोलावलेली बैठक व्यापार्‍यांनी उधळून लावली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे व्यापार्‍यांची भूमिका मांडली जाणार असल्याचे महापालिकेने यानंतर स्पष्ट केले.
मुख्यमंत्री यांनी दोन दिवसांपूर्वी 26 महापालिकांचे महापौर व आयुक्तांची संयुक्त बैठक घेतली. त्यात ठरल्याप्रमाणे महापालिकेत चार वाजता व्यापार्‍यांची बैठक बोलावण्यात आली होती. व्यापार्‍यांच्या वतीने अशोक जैन, घनश्याम राठी, किरण पातूरकर, नितीन मोहोड यांनी भूमिका विषद केली. नितीन मोहोड भूमिका मांडत असताना व्यापार्‍यांनी गदारोळास सुरुवात केली. स्थानिक संस्था कर बंद करा शिवाय जकातही सुरू करू नये, अशी भूमिका व्यापार्‍यांनी घेतली. राज्यातून एलबीटी व जकात दोन्ही कर हद्दपार करण्याशिवाय गत्यंतर नाही. या करप्रणाली भ्रष्टाचारास खतपाणी घालणार्‍या आहेत. यामुळे ‘इन्सपेक्टर राज’ पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमइडीसीने सुचवलेल्या पर्यायी कराबाबत व्यापारी संघटना सकारात्मक असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

बैठकीला महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, विरोधी पक्षनेते प्रा. प्रशांत वानखडे, पक्षनेते बबलू शेखावत, गटनेते प्रकाश बनसोड, अविनाश मार्डीकर, दिगंबर डहाके, उपायुक्त रामदास सिद्धभट्टी, व्यापारी संघटनेचे सुरेश जैन, घनश्याम राठी, किरण पातूरकर, नितीन मोहोड, अनिल तडरेजा, जयंत कामदार, अविनाश चुटके, रमेश मुरके यांच्यासह 20 संघटनांचे प्रतिनिधी, महापालिकेचे एलबीटी अधिकारी योगेश पिठे, राहुल ओगले, सुनील पकडे उपस्थित होते.