आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Amravati Municipal Corporation

अमरावती मनपात आता परिवहन समिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महापालिकेत परिवहन समिती गठित केली जाणार आहे. महापौर वंदना कंगाले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्टार बससंदर्भात झालेल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले.
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवनिर्माण अभियानांतर्गत अमरावती मनपाला केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाकडून 64 स्टार बस मंजूर झाल्या आहेत. बसच्या नियोजनासाठी आयुक्तांच्या कक्षात सकाळी 11:30 वाजता बैठकीत चर्चा झाली. परिवहन समितीबाबत प्रशासनाने तयार केलेले धोरण सर्वसाधारण सभेसमोर ठेवले जाईल, असे या वेळी ठरले. 64 बस प्राप्त होणार असल्याने मनपा क्षेत्रातील परिवहन व्यवस्थेत बदल होणार आहेत.


बैठकीला आयुक्त अरुण डोंगरे, नंदकिशोर वर्‍हाडे, सुगनचंद गुप्ता, बबलू शेखावत, प्रा. प्रशांत वानखडे, अविनाश मार्डीकर, संजय अग्रवाल, प्रकाश बनसोड, अजय गोंडाणे आदींची उपस्थिती होती.


प्रस्तावित डेपोची केली पाहणी
महापौर वंदना कंगाले आणि आयुक्त डोंगरे यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी प्रस्तावित डेपोची पाहणी केली. कोंडेश्वर रोडवरील जुन्या जकात नाक्याच्या ठिकाणी डेपो प्रस्तावित आहे. सद्य:स्थितीतील जागेत सुधारणा केल्यानंतर तेथे कार्यशाळा उभारणे शक्य होईल. 64 बसच्या दृष्टीने ही जागा पर्याप्त असल्याची चर्चा या वेळी झाल्याची माहिती आहे.