आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Amravati Municipal Corporation

अमरावती मनपाचे 11 कर्मचारी बडतर्फ, आयुक्तांची कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील 11 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले. आयुक्त अरुण डोंगरे यांनी बुधवारी ही कारवाई केली. कर्तव्यात कसूर केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.आरोग्य विभागातील अश्विन डिक्याव, संजय पंडित, चंदन संकत, बबिता सारसर, अजय सारसर, भारती तंबोले, शिवा तंबोले, रवि सारवान, र्शीकांत रगडे, दिनेश सारवान, रोशनी सांडे अशी बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर करणार्‍या मनपा कर्मचार्‍यांची यादी मोठी आहे. याबाबत नगरसेवकांनी मागील आमसभेत चर्चा घडवून आणली होती. अशा कर्मचार्‍यांची गय केली जाणार नसल्याचे संकेत त्यावेळी आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार कर्तव्यात कसूर ठेवणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा आयुक्तांनी उगारला आहे. यापूर्वी सोमवारी (दि. 24) सहायक संचालक नगर रचना विभागातील जागा निरीक्षक गणेश कुत्तरमारे यांना निलंबित करण्यात आले. कर्तव्यात कुचराई करणार्‍या अन्य कर्मचार्‍यांना त्यांची आता काही खैर नाही, हा संदेश या कारवाईतून आयुक्तांनी दिला आहे.


एडीटीपीचा प्रभार व्ही. बी. शिंदेंकडे
नगर रचना उपसंचालक कार्यालयातील व्ही. बी. शिंदे यांच्याकडे सहायक संचालक नगर रचना अधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला असल्याची माहिती आहे. अमरावती महानगरपालिकेतील सहायक संचालक नगर रचना पदाचा प्रभार असलेले गिरीश आगरकर यांच्याबाबत पदाधिकारी तसेच नगरसेवकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्याबाबत शासनाकडे प्रस्तावदेखील पाठवण्यात आला होता. अखेर शासनाकडून त्यावर कारवाई करण्यात आली.