आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Anand Adsul, Shiv Sena, Divya Marathi

वृत्तवाहिनीने केलेले चित्रीकरण तपासण्याची अडसूळ यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजताच राजकीय नेत्यांनी आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे. यातच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि शिवसेनेचे उमेदवार खासदार अडसूळ यांच्यातील शाब्दिक द्वंद्व सुरू झाले. खासदार अडसूळ व नवनीत राणा यांच्यातील वाद रविवारी थेट पोलिसांत पोहोचला. राणा यांच्या तक्रारीनंतर गाडगेनगर पोलिसांनी खासदार अडसुळांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत चांगलाच तणाव निर्माण झाला होता. या सार्‍या प्रकारामुळे होळीच्या दिवशी अमरावतीकरांना खर्‍या अर्थाने राजकीय शिमगा अनुभवास आला.


खासदार अडसूळ यांनी चारित्र्यहीन असल्याचा आरोप केल्याचे राणा यांचे म्हणणे आहे. सकाळी अकरा वाजता एका खासगी वृत्तवाहिनीच्या बसमध्ये हा प्रकार घडताच नवनीत राणा त्यांच्या सर्मथकांसह गाडगेनगर पोलिस ठाण्यात पोहोचल्या. नवनीत राणांसोबत खासदार अडसूळ व त्यांच्या सर्मथक शिवसैनिकांनी केलेले कथित वर्तन योग्य नसल्याचा आरोप करून राणा सर्मथक चांगलेच संतप्त झाले होते. अवघ्या अध्र्या तासात गाडगेनगर पोलिस ठाण्यात शेकडो राणा सर्मथक हजर झाले.


ठाण्याच्या बाहेर जवळपास 100 वाहनांचा ताफा जमा झाला होता. खासदार अडसूळ यांनी माझ्यावर यापूर्वीसुद्धा चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला. वास्तविक मी कोणत्या प्रकारे चारित्र्यहीन आहे, हे खासदार अडसूळ यांनी सिद्ध करून द्यावे, मला निवडणूक लढवण्याचा अधिकारही नाही का? त्यांनी माझ्यावर केलेले आरोप हे संपूर्ण महिलांवर असलेली चिखलफेक असल्याचे राणा यांनी म्हटले आहे.


राजकारणात अशा प्रकारचे आरोप करणे अतिशय दुर्दैवी आहे. रविवारी बसमध्ये घडलेला प्रकार अतिशय निंदनीय होता. बसमधील त्या निवेदकांनी मध्यस्थी केली नसती, तर शिवसैनिक माझ्या अंगावर धावलेच होते. ते काहीही करू शकले असते, असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे. काही वेळानंतर आमदार रवि राणासुद्धा ठाण्यात पोहोचले. त्यांनीसुद्धा या घटनेचा निषेध केला. लोकसभा निवडणुकीचे नामांकन अर्ज दाखल होण्यापूर्वीच दोन प्रबळ दावेदारांमध्ये सुरू झालेला हा राजकीय शिमगा निवडणुकीदरम्यान कोणत्या स्तराला पोहोचणार, हे मात्र सांगणे कठीण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.