आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Election Nomination, Divya Marathi, Candidate

न‍िवडणुकीचा आखाडा: दुसर्‍या नामांकनाला दिवशीही सुटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - धुलिवंदनाच्या सुटीमुळे सोमवारीही नामांकन प्रक्रियेला सुटी आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सलग दोन दिवसांचा खंड पडला असून, आता थेट मंगळवारी (दि. 18) उमेदवारी अर्ज भरता येईल.
10 एप्रिलला होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी सहा मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर 15 ते 22 मार्चदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नामांकनाच्या पहिल्या दिवशी 31 उमेदवारांनी 58 अर्जांची उचल केली; परंतु दुपारी तीन वाजेपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नव्हता. अर्ज दाखल केल्यानंतर लगेच त्या-त्या उमेदवाराचे निवडणूक खर्चाचे खाते सुरू केले जाते. शिवाय त्या खात्यासाठी दररोजच्या खर्चाच्या नोंदीही निवडणूक यंत्रणेपर्यंत पोहोचवणे अनिवार्य केले जाते.


ही ‘झंझट’ शक्य तेवढय़ा उशिरा सुरू व्हावी, अशी प्रत्येक उमेदवार व त्याच्या पक्षाची अपेक्षा असते. त्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घाई टाळली जात असावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, शेवटच्या दोन दिवसांत (21, 22 मार्च) बहुतेक उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती असून, सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार या दिवशी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या दालनात गर्दी करतील, असे सूत्रांकडून समजते.