आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Lok Sabha Election, Congress, Nationalist Congress

निकालापूर्वीच तापले सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्‍ये राजकीय वातावरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये सुरू झालेली भांडणे, राष्ट्रवादीमध्ये नव्यानेच जम बसवलेल्या रवि राणा यांनी काँग्रेसच्या प्रस्थापित आमदारांवर प्रचार करण्याच्या मुद्दय़ावरून केलेल्या गंभीर आरोपांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे शिवसेना-भाजप महायुतीत मात्र सारे काही आलबेल असल्याचे चित्र दिसत आहे.अद्याप मतमोजणीला एक महिना बाकी आहे. मात्र, 10 एप्रिलला झालेल्या मतदानानंतर जिल्ह्याच्या विविध भागांतून अंदाज व्यक्त केले जात आहेत. निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांना मतदानानंतर जनमत चाचण्यांवर बंदी घातली आहे.

अद्याप मतमोजणीचे निकाल लागले नाहीत. मात्र, तरीही अमरावती आणि तिवसा या दोन विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराचे कार्य या क्षेत्रातील दोन आमदारांनी केले नसल्याचा आरोप राणा दाम्पत्याकडून होत आहे. त्यामुळे निकालाविषयी रवि राणा यांचा अंदाज सर्वसामान्य जनतेसाठी लक्षवेधी ठरत आहे. असे असतानादेखील रवि राणा यांनी रावसाहेब शेखावत आणि यशोमती ठाकूर या दोन आमदारांवर दाखवलेला अविश्वास म्हणजे भविष्यात जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय युद्धाची सुरुवात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.


अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अमरावती, मेळघाट, दर्यापूर, अचलपूर, बडनेरा आणि तिवसा या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. यांपैकी फक्त दोनच मतदारसंघांतील आमदारांवर राणा यांनी प्रचार न केल्याचा आरोप केला आहे. उर्वरित चार मतदारसंघांतील नवनीत राणा यांच्याकरिता प्रचार यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असल्याचा विश्वास राणा दाम्पत्याला आहे. काँग्रेस आघाडीतील नाराजी व वाढत्या कुरबुरी आणि 16 मे रोजी जाहीर होणार्‍या निकालानंतर राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

प्रशासकीय यंत्रणेवरचा राग कायम
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीमध्ये कुरबुरी वाढल्या असताना शिवसेना-भाजप महायुतीच्या नेत्यांमध्ये मात्र सध्या कोणत्याही प्रकारची कुरबुरी अथवा भांडणे असल्याचे चित्र दिसत नाही. सेना- भाजपचे सर्व नेते एकमेकांनी राबवलेल्या प्रचार यंत्रणेवर समाधानी असल्याचेच चित्र आहे. मतदानाच्या दिवशी 46 हजार मतदारांची नावे यादीत नसल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवरचा राग अद्यापही कायम असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तापलेल्या वातावरणाचा परिणाम निवडणूक निकालानंतरच दिसून येईल, अशी चर्चा सुरू आहे.