आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Man Stabbed Two Brothers

व्यावसायिक वादातून दोघा भावंडांना चाकूने भोसकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - व्यवसायिक वादातून एका व्यक्तीने दोघा भावंडांवर चाकूने हल्ला केला. त्यापैकी एक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी चांदणी चौकात घडली.गवळीपुरा येथील सय्यद सलीम सय्यद सलाम (32) आणि सय्यद कलीम सय्यद सलाम (35) या भावंडांवर इक्रोमोद्दीन वल्द ताजोद्दीन (28, रा. चांदणी चौक) याने चाकुहल्ला केला. सय्यद सलीम आणि इक्रोमोद्दीन हे मोटार मेकॅनिक आहेत. गवळीपुरा भागात त्यांची दुकाने आहेत. व्यावसायिक स्पध्रेतून त्यांच्यात वाद झाला होता. बुधवारी हे दोघे चांदणी चौकात पुन्हा आमने-सामने आले. दरम्यान, इक्रमोद्दीनने सय्यद सलीमवर चाकूने वार केले. सय्यद कलीमने चांदणी चौक गाठताच इक्रमोद्दीनने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. यानंतर इक्रामोद्दीन पसार झाला.


सय्यद सलीमला तातडीने इर्विन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी सय्यद कलीमने नागपुरी गेट पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी इक्रमोद्दीनविरुद्ध मारहाण आणि हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नागपुरी गेट आणि गुन्हे शाखा पोलिसांनी त्याचा शोध सुरू असल्याची माहिती नागपुरी गेटचे पोलिस उपनिरीक्षक अशोक मिश्रा यांनी दिली.