आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी दिन विशेष: साय मी खातो मराठीच्या दुधाची..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान
असे गर्वाने सांगणारे कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन व मराठी राजभाषा दिनानिमित्त अमरावतीकरांनी भाषाभिमान व्यक्त केला. मराठीचे संवर्धन करणे ही आज काळाची गरज बनली आहे, अशा प्रतिक्रिया तरुणांनी दिल्यात.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
असे कवी सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे मराठी बोलता येणं ही भाग्याची गोष्ट आहे. मराठी भाषा आणि साहित्याचा जगभर प्रसार करण्यासाठी नवमाध्यमांचा प्रभावी वापर कसा करून घेता येईल याकडे लक्ष द्यावे, असे तरुणांना वाटते.


शासनाकडून प्रयत्न गरजेचे
मराठी भाषा संवर्धनासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. मराठी माणसांमध्ये कार्यप्रवणता येणे गरजेचे आहे. यासाठी सामूहिक प्रयत्न आणि पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. गौरव भारंबे, विद्यार्थी


साहित्यकृतीचे वाचन करावे
चांगल्या मराठी भाषेत बोलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न विदर्भातील लोकांनी करायला पाहिजे. मराठी भाषेतील गोडवा टिकून राहण्याची गरज आहे. ललित साहित्य कलाकृतींचे आणि मराठी भाषेचे वाचन करायला पाहिजे, असे आवाहन आहे. डॉ. मोना चिमोटे, सहयोगी प्राध्यापक, अमरावती विद्यापीठ.


भाषेचा अभिमान ठेवावा
मराठी भाषेतील दज्रेदार साहित्य, मराठी भाषकांच्या संस्कृतीचा जगभर प्रसार होण्यासाठी इंटरनेट हे एक वरदान लाभले आहे. त्याचा सदुपयोग युवकांनी करून घेतला पाहिजे. मराठी ही आपली भाषा असल्याने तिचा अभिमान जपावा. विक्रम मोडक, विद्यार्थी