आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकहून बेपत्ता मुली सापडल्या अमरावतीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - घरगुती वादामुळे नाशिक येथून पळून आलेल्या तीन अल्पवयीन मुलींना स्थानिक राजापेठ पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले.नाशिकहून गुरुवारी (दि. 20) या मुली मुंबईला पोहोचल्या. तेथून रविवारी त्या अमरावतीत दाखल झाल्या होत्या. साईनगरमध्ये एका घरात खोटे कारण सांगून त्या भाड्याने राहत होत्या. संशयावरून घरमालकिणीने त्यांची विचारपूस केली. यानंतर त्यातील एकीच्या वडिलांशी संपर्क साधला.


नाशिकमधील अंबड पोलिस ठाण्यात या तिघींसंदर्भात हरवल्याची तक्रार दाखल आहे. मुलींच्या पालकांशी संपर्क साधल्यानंतर ते त्यांना घेण्यासाठी नाशिकहून निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली. वृत्त लिहिपर्यंत मुलींबाबत राजापेठ पोलिसांत कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.