आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Police, Bank, Divya Marathi

जप्त करण्यात आलेली ‘ते’ 75 लाख कोंबड्यांच्या खरेदीसाठी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अर्जुननगर सीलिंग पॉइंटवर पंधरा दिवसांपूर्वी कारमधून जप्त करण्यात आलेली 75 लाखांची रोकड कोंबड्या खरेदी करण्यासाठी बँकेतून काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव येथून नुकत्याच परतलेल्या गाडगेनगर पोलिसांच्या पथकाला तेथील बँकेने ही माहिती दिली.


निवडणूक काळात रक्कम सापडल्याने पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला होता. राजनांदगाव येथील बँक ऑफ इंडियातून ती रक्कम काढण्यात आली होती, असे पुढे आल्याने तेथे पोलिस पथक पाठवण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी बँक प्रशासनाला विचारणा केली असता, सदर कंपनीने ती रक्कम कोंबड्या खरेदी करण्यासाठी काढली आहे, कंपनीचे बँकेत खाते असून नियमित व्यवहार सुरू असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. मात्र, पोलिस अजूनही या माहितीमुळे समाधानी नसून, सखोल तपास सूरू असल्याचे गाडगेनगरचे ठाणेदार दीपक करूलकर यांनी सांगितले.