आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Railway Travelling, Divya Marathi

रेल्वेला फटका, बस ‘ओव्हर फ्लो’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - जळगाव खान्देशातील बोदवडजवळ झालेल्या रेल्वे अपघातामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावरील वाहतूक रविवारी (दि. 9) विस्कळीत होती. वाहतुकीवरील या परिणामामुळे रेल्वेच्या उत्पन्नाला फटका बसला, तर एसटी बस प्रवाशांनी ‘ओव्हर फ्लो’ झाल्यात.


बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर ते वर्धापर्यंत दररोज नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने आवागमन करणार्‍या अमरावतीकरांना रविवार, सोमवारी सलग दोन दिवस एसटीचाच सहारा घ्यावा लागला. पश्चिम विदर्भाचे विभागीय केंद्र असल्याने अमरावतीत बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, खामगाव, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, वर्धा, सेवाग्राम येथून दररोज शेकडो लोक पहाटे पाचपासून रेल्वे गाड्यांनी येतात. तथापि, अप आणि डाउन दोन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकडे धावणारी एक्सप्रेस कुरुम स्थानकावर रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवण्यात आली होती. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अमरावती-मुंबई एक्सप्रेस मूर्तिजापूर येथे पोहोचली.


रेल्वे गाड्या अन् प्रवासी संख्या
नागपूर-मुंबई मार्ग : 32
मुंबई-नागपूर मार्ग : 34
प्रवासी संख्या : 23 हजार 985
सरासरी उत्पन्न : 3 लाख 68 हजार 236


प्रवासी वाढीचे मार्ग
* नागपूर-अमरावती : 1856
* वर्धा-अमरावती : 352
* अमरावती-मूर्तिजापूर : 456
* अमरावती-अकोला : 758
* अमरावती-बाळापूर : 325
* अमरावती-शेगाव : 381
* अमरावती-बुलडाणा : 387
* अमरावती-नांदुरा : 311
* अमरावती-मलकापूर : 325