आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, State Reserve Police Force, Suicide, Divya Marathi

राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राज्य राखीव बल गट ग्रमांक नऊमध्ये कार्यरत 26 वर्षीय जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी विद्यापीठ तलावाच्या मागील झाडीत आढळून आला. या घटनेने एसआरपीएफ कॅम्प परिसरात खळबळ उडाली आहे.


रत्नरक्षक प्रकाश खडसे (26, रा. एसआरपीएफ वसाहत, अमरावती) असे आत्महत्या करणार्‍या जवानाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी गुरे चारणार्‍या महिलेला त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या महिलेने या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. नागरिकांनी पोलिसांना कळवताच फ्रेजरपुरा ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांना रत्नरक्षक यांनी मृत्युपूर्व लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नसल्याचे लिहिलेले आहे. मृत्यूचे नेमके कारण पुढे आले नसून, प्रकरणाचा तपास फ्रेजरपुरा पोलिस करत आहेत.