आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Student, Suicide, Divya Marathi

13 वर्षीय विद्यार्थ्याची जाळून घेऊन आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापूर - क्षुल्लक कारणावरून 13 वर्षीय विद्यार्थ्याने स्वत:ला जाळून घेतले होते. ही घटना शहरातील मूर्तिजापूर मार्गावरील गजानन महाराज मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी घडली. त्याचा मंगळवारी मृत्यू झाला.परीक्षित रवींद्र कातडे असे मृतकाचे नाव असून, तो प्रबोधन विद्यालयात आठव्या वर्गात शिकत होता. क्षुल्लक घरगुती कारणावरून सोमवारी सायंकाळी परीक्षित रागाच्या भरात घराच्या मागच्या बाजूला असलेल्या रेल्वे रुळावर गेला. तेथे त्याने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. यात तो नव्वद टक्के जळाल्याने त्याला तातडीने अमरावती येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

बुधवारी त्याच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे प्रबोधन विद्यालयात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. परीक्षितचे वडील रवींद्र कातडे कपडे शिवण्याचे काम करतात, तर आई गृहिणी आहे. परीक्षितला मोठी बहीण आहे.क्षुल्लक कारणावरून परीक्षितने घेतलेल्या या टोकाच्या भूमिकेबद्दल समाजमन हादरून गेले. दर्यापूर पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.