आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Thailand King, Farmer, Divya Marathi

थायलंडचा राजा घेतो शेतकर्‍यांची काळजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - थायलंडचा राजा देशातील प्रत्येक नागरिकासह गरीब शेतकर्‍यांचीही विशेष काळजी घेतो, त्यामुळे थाई शेतकरी भारतातील शेतकर्‍यांपेक्षा आनंदी व आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रा. तानी श्री वाँग चाई यांनी रविवारी (दि. 16) सांगितले.


बँकॉक येथील कसेटसाल्ट कृषी विद्यापीठातील तीन प्राध्यापकांसह 14 पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील विरुळ रोंगे गावाला नुकतीच भेट दिली. विद्यापीठाची ही चमू देशातील विविध भागांना भेटी देत असून, भारतातील शेतीबाबत माहिती जाणून घेत आहेत. यात विद्यापीठाच्या अँग्रोनॉमी विभागाचे प्रा. डॉ. तानी श्री वाँग चाई, प्रा. डॉ. प्रापा श्री पीचीट्टी, प्रा. डॉ. अद सारोबोल यांच्यासह पीएच.डी.च्या 14 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यात विरुळ रोंगे येथील माजी सरपंच व पीएच.डी.ची विद्यार्थिनी दीप्ती वानखडे यांचाही समावेश होता. विद्यापीठाच्या या चमूने जिल्ह्यातील विरुळ रोंगे व काहीकॉक विद्यापीठातील प्रा.प्रापा श्री पिचीती, दिप्ती वानखडे यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले.शेतीला भेट दिली. त्यानंतर रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत वाँग चाई बोलत होते.


वाँग चाई म्हणाले, शेतीसाठी लागणारे नैसर्गिक स्रोत भारतात थायलडंच्या तुलनेत अधिक आहे; परंतु त्याचा योग्य प्रकारे वापर नसल्यामुळे येथील शेती तुलनेने मागास दिसून येते. थायलंडमध्ये धानाचेच प्रमुख पीक आहे; परंतु भारतात विविध भागांत विविध पिके घेतली जातात.


गावातील घाणीबद्दल वाटले आश्चर्य : विरुळ रोंगे गावात विद्यापीठाच्या चमूने भेट दिली असता, त्यांना गावात कमालीची घाण, उघड्यावरील प्रातर्विधीसाठी बसलेले नागरिक दिसून आले. या चमूला घाण व उघड्यावरील शौचाचे मोठे नवल वाटले. प्रा. प्रापा श्री पिचीती म्हणाले, थायलंडमधील कुण्याही गावात गेला तरी अशी घाण औषधालाही दिसणार नाही. गावे चकचकीत असून, गावातील प्रत्येक नागरिक स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक असतो. थायलंडमध्ये कुणीही उघड्यावर थुंकतही नसल्याचे ते म्हणाले.


गावांमध्ये राजकारणाचा लवलेशही नाही
येथे प्रत्येक गावात घराघरांत राजकारण पोचल्याचे दिसते; परंतु थायलंडमध्ये अशा स्वरूपाचे राजकारण कुठेही दिसून येत नसल्याचे प्रा. वाँग चाई यांनी सांगितले.