आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Whatsapp, Information Technology

शहर पोलिसांच्या दिमतीला आता ‘व्हाट्स अँप’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पोलिस खात्यास माहिती-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फायदा करून घेण्यासाठी अमरावती पोलिस आयुक्तालयाने पाऊल टाकले आहे. गुन्ह्यांची तातडीने माहिती मिळून नियंत्रणासाठी सर्व पोलिस अधिकार्‍यांनी ‘व्हाट्स अँप’चा वापर करावा, असे आदेश नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला यांनी दिले आहेत.
अँन्ड्रॉइड मोबाइल फोन वापरणार्‍यांमध्ये पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पोलिस खात्याच्या कामासाठी ‘व्हाट्सअँप’च्या उपयोगाचा कानमंत्र आयुक्त मेकला यांनी सोमवारी दिला. पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि पोलिस आयुक्त यांचा एक स्वतंत्र ग्रुप यासाठी तयार करण्यात येणार असून, इतर अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा ‘व्हाट्स अँप’वर जोडले जाणार आहेत. पोलिसांना शहरातील विविध घटनांची तातडीने माहिती मिळून संबधित घटनेची छायाचित्र, व्हिडिओ ‘व्हाट्स अँप’ च्या माध्यमातून त्वरित उपलब्ध झाल्यास गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी या आधुनिक माध्यमाचा फायदा होणार आहे. असा आशावाद डॉ. मेकला यांनी व्यक्त केला आहे.


पोलिस दलातील तरुणांची आणि आधुनिक मोबाईल वापरणार्‍यांची संख्या पाहता आयुक्तांच्या या निर्णयाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी स्वागत केले आहे. लवकरच याचा वापर सुरू केला जाणार आहे.


शिस्त आणि सुरक्षेसाठी आता पोलिस कर्मचारी घालणार हेल्मेट
गस्तीवरील प्रत्येक पोलिस कर्मचार्‍याने दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणे सक्तीचे झाले आहे. पहिल्या टप्प्यात शहर वाहतूक शाखेचे पोलिस, ठाण्यांच्या हद्दीत सतत गस्तीवर असणारे चार्ली कमांडो यांना सोमवारपासूनच हेल्मेटसक्तीचा आदेश मिळाला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. शहर पोलिस दलाकडे सध्या 239 हेल्मेट आहेत. उर्वरित पोलिसांना लवकरच हेल्मेट मिळतील. तूर्तास आहे तेवढय़ा हेल्मेटचा वापर सुरू झाला असून, त्यामुळे शिस्तीसोबतच पोलिसांची सुरक्षासुद्धा वाढणार आहे. पोलिस आयुक्तांच्या या निर्णयामुळे आगामी काळात सर्वसामान्य दुचाकीस्वारांनाही हेल्मेटसक्ती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.