आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amravati News On Politics, Amravati Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेची मालमत्ता कराचे 21 कोटी थकीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - मालमत्ता कराचे 21 कोटी 17 लाख रुपये नागरिकांकडे थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. 16 कोटी 48 लाख रुपयांची वसुली करण्यात आली असून, ती रक्कम एकूण मागणीच्या 44 टक्के एवढी आहे. त्यापैकी 20 लाख रुपयांची वसुली किऑस्क पेमेंट गेट-वे आणि ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे.


स्थानिक संस्था कर आणि मालमत्ता कर हे महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. महापालिकेला मालमत्ता कराच्या रूपात एकूण 52 कोटी 35 लाख रुपये प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यापैकी सातुर्णा औद्योगिक वसाहतीकडील रक्कम 14 कोटी 69 लाख रुपये आहे. एमआयडीसीकडील मालमत्ता कराचा प्रश्न 2006 पासून अधांतरी होता. मागील महिन्यात आमदार रावसाहेब शेखावत यांच्या उपस्थितीत उद्योजकांच्या झालेल्या बैठकीत हा विषय निकाली निघाला आहे. आठ वर्षांची ही थकीत रक्कम आहे. ती वसूल केली जाणार असल्याचे मनपा आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.


ऑनलाइन प्रणालीचा लाभ : महापालिकेमध्ये प्रवेश न करता प्रवेशद्वाराजवळच मालमत्ता कर भरता यावा म्हणून ऑनलाइन पेमेंट गेट-वे प्रणाली लावण्यात आली आहे. नगदी स्वरूपात तेथे मालमत्ता कर भरता येणार आहे. शिवाय धनादेश आणि डिमांड ड्राफ्टनेदेखील मालमत्ता कर भरणे शक्य झाले आहे. या प्रणालीद्वारे आतापर्यंत 20 लाख रुपयांचा मालमत्ता कर भरण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.