आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी अमरावतीकर खेळाडू झाले सज्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उन्हाळ्याच्या सुट्यामध्ये सराव करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार झालेला खेळाडूंचा संघ.)
अमरावती- उत्तर प्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पोर्टस डान्स स्पर्धेसाठी अमरावतीकर खेळाडू सज्ज आहेत. त्यांनी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कसून सराव करून राष्ट्रीय स्तरावरही यश मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. शालेय स्पर्धेत नव्याने अंतर्भूत झालेल्या या क्रीडा प्रकारामुळे शालेय गटातील नर्तकांनाही आता मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
नृत्य या व्यायाम प्रकाराला शासनाने शालेय क्रीडा स्पर्धेत सर्व नृत्य प्रकारांना स्पोर्टस डान्स या नावाने मान्यता दिली आहे. गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे स्पोर्टस डान्स फेडरेशन आॅफ इंडियातर्फे पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेचे एचएलएम इन्स्टिटयूट येथे आयोजन केले आहे.
राज्यस्तरीय स्पोर्टस डान्स स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक पटकावणारे खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले. विशेष बाब अशी की, अमरावतीच्या खेळाडूंनी अहमदनगर येथे झालेल्या स्पर्धेत बहुतेक पदकं ही अमरावतीकर खेळाडूंनी पटकावली. त्यामुळे साहजिकच राष्ट्रीय स्पर्धेत बहुसंख्येने अंबानगरीच्या खेळाडूंची वर्णी लागणार आहे. शास्त्रीय, लोकनृत्य, पाश्चात्य शैली या प्रकारासह स्केटिंग जिम्नॅस्टिक या नव्या नृत्य प्रकारांचाही स्पर्धेत समावेश आहे. सर्व खेळाडू प्रशिक्षक सतीश ठाकरे, सागर देशमुख, निखिल जुन्नके यांच्या मार्गदर्शनात तयार झाले आहेत. जिल्हा स्पोर्ट्स डान्स संघटनेचे सचिव नितीन पोटे यांच्या मार्गदर्शनात खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.
खेळाडूंना मोहनलाल सामरा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्याणी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीन चवाळे, उपाध्यक्ष सुभाष थोरात, श्रीकांत पाटील पालकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्केटिंग डान्स ग्रुप : गोपालवरू, अमेय पोटे, पृथ्वीराज लकडे, विश्वजित मलीक, आशुतोष नागपुरे, कृष्णा राठी, रिया बोके, नेहा सावरकर, नितिका मलीक.
जिम्नॅस्टिक्स डान्स ग्रुप : कौशिक यावलकर, रजत चोपकर, हर्षवर्धन हिरोडे, केशव राठी, राजवीर राहल, आदित्य राहल, विनित पटवा, शिवाजी भोयर.
ड्युएट: मुलांमध्ये कौशल शर्मा, कार्तिक पोकळे, मुलींमध्ये सई चिमोटे, राधा कोठीवान.
सोलो: याप्रकारात शास्त्रीय नृत्य गटात अंजनगांव सूर्जी येथील तन्मय थोरातने संघटना शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. त्यामुळे त्याची एकट्याचीच निवड झाली आहे.

एकाच वेळी नृत्य अन् व्यायाम : कोणतेही नृत्य करताना संपूर्ण शरीराची हालचाल होते. बरे ही हालचाल एका आकृतीबंधात करावी लागते. नृत्य म्हणजे शरीराद्वारे सुरेख दिसेल अशी आकृती तयार करून वाद्याच्या तालावर अन् ठेक्यावर वेगाने शरीराची हालचाल करण्याची प्रक्रिया होय. यामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम िमळत असतो. तसेच मन प्रफुल्लीत आनंदी राहते, असे मत सचिव प्रवीण पोटे यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...