आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Police Going Other District For Election Duty Issue At Amravati

इलेक्शन ड्युटी’साठी शहर पोलिस आता विदर्भाबाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - विदर्भातील लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता अमरावती शहर पोलिस 17 एप्रिलला होणार्‍या सांगली व लातूरच्या निवडणूक मोहिमेवर रवाना झाले आहेत. यानंतर तिसर्‍या टप्प्यातील मतदानासाठी अमरावती पोलिसांची चमू नाशिकला पोहोचणार आहे.

अमरावती शहर पोलिस दलातील दोन उपनिरीक्षक आणि 200 कर्मचारी शुक्रवारी सांगली, तर एक उपनिरीक्षक व 50 कर्मचारी लातूरला रवाना झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा 17 एप्रिल व तिसरा टप्पा 24 एप्रिलला होणार आहे. 17 एप्रिलला सांगलीतील निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर अमरावती शहर पोलिसांचे मनुष्यबळ नाशिक ग्रामीणमध्ये बंदोबस्तासाठी पोहोचणार आहे.

पोलिसांवर इलेक्शनचा विलक्षण ताण असतो. त्यामुळे महाराष्ट्रात तीन टप्प्यांत निवडणूक घेण्यात येत आहे. निवडणूक काळात कुठे स्फोटक परिस्थिती उद्भवल्यास कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांची असते. अमरावती मतदारसंघाचे मतदान आटोपल्याने आता स्ट्राँगरूम वगळता इतर ठिकाणी बंदोबस्ताची गरज नाही. निवडणूक बंदोबस्तासाठी मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ लागत असल्याने राज्यात या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात पोलिसांची कुमक पाठवण्यात येत असून, त्याअंतर्गतच पोलिस लातूर, सांगलीसाठी रवाना झाले आहेत. लातूरला जाणार्‍या पोलिस तुकडीसाठी शुक्रवारी दुपारी राज्य परिवहन महामंडळची बस आणि सांगलीला जाणार्‍या पथकासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयातील सूत्रांनी ही दिली.