आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Police Make Super Plan For Finding Thief Vehicle

‘सुपर प्लॅन'मुळे वाहन चोरींच्या तपासाला गती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात सध्या वाहनचोरींचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत वाहनचोरांना पकडून चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना फारसे यश आले नाही. अशावेळी चोरीच्या दुचाकी शोधण्यासाठी तपासाला गती यावी म्हणून शहर पोलिसांनी ‘सुपर प्लॅन’ तयार केला आहे. या अंतर्गत शहर पोलिस विदर्भातील सर्वच आरटीओ कार्यालयांत असलेला प्रत्येक वाहनाचा डाटा मिळवून तो स्वत:कडे साठवून ठेवणार आहे. हा डाटा पोलिसांकडे असल्यास तातडीने तपासचक्रे फिरवून वाहन चोरट्याला जेरबंद करण्यास मदत होणार आहे.
दुचाकी चोरीची तक्रार आल्यानंतर त्या दुचाकींची सविस्तर माहिती पोलिसांना आरटीओ कार्यालयाकडून किंवा वाहनांच्या कंपनीकडून घ्यावी लागते.

आम्ही विदर्भातील आरटीओंना पत्र देऊन वाहनांचा डाटा मागवणार आहे. हा डाटा उपलब्ध झाल्यास वाहन चोरीच्या तपासाला गती येईल; तसेच वाहनचोरीला लगामसुद्धा लावण्यात यश येणार आहे. बी.के. गावराने, पोलिस उपायुक्त.

कांचन पांडे यांचा प्रयोग

ही कल्पना शहर कोतवाली ठाण्याचे एपीआय कांचन पांडे यांची आहे. त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर एका जिल्ह्याचा डाटा मिळवून काम सुरू केले आहे. यामुळे त्यांना तपासात फायदा होत आहे. याच धर्तीवर संपूर्ण विदर्भाचा डाटा मिळाल्यास प्रभावीपणे मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.