आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती-पुणे रेल्वे नियमित होण्याचे शुभसंकेत, वेळेतही केला जाणार बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असून अमरावती जिल्ह्यातून बहुतांशजण नोकरी शिक्षणासाठी पुणे येथे राहतात. दररोज पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता अमरावती-पुणे व्हाया लातूर ही गाडी दोन वर्षापूर्वी खास अमरावतीकरांसाठी सुरु करण्यात आली होती. परंतु प्रवाशांचा अधिक आेघ बघता ही गाडी दररोज करण्याची मागणी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून यावर सकारात्मक विचार झाला आहे. जूलै महिन्यात या गाडीच्या वेळापत्रकात बदल होणार असून तेव्हापासूनच ही गाडी नियमित करण्यात येईल, असे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, अमरावती-पुणे ही गाडी सध्या सोमवारी शनिवारी फलाट क्रमांक वरुन सुटते. तर हीच गाडी पुणे स्टेशनच्या फलाट क्रमांक वरुन रविवारी मंगळवारी अमरावतीला पोहचते.
आठवड्यातून सध्या दोन दिवस ही गाडी असल्याने पुणेकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. बहुतांश जणांना आपला प्रवास टिकिट आरक्षण मिळाल्यामुळे किंवा वेटिंगवर असल्यामुळे रद्द करावा लागत आहे.

प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी ही गाडी नियमित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे, असे सुत्रांनी सांगितले. या गाडीमुळे पुण्याला जाणाऱ्यांची सोय होणार आहे.
सायंकाळी ६.३० वाजता ही गाडी अमरावती स्थानकावरुन सुटते. तर दुसऱ्या दिवशी वाजून १३ मिनिटांनी पुण्याला पोहचण्याचा वेळ आहे. या दरम्यान ही गाडी बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुरुडवाडी, जेऊर, दौंड, उरुली शेवटी पुणे येथे पोहचेल. प्रवासाच्या कालावधीत ही गाडी १६ स्थानकांवर थांबते. ८२३ किलोमीटरचा असलेला हा प्रवास ही गाडी एकूण १८ तास ४५
मिनिटांत पूर्ण करते.
- प्रवाशांनी मागणी पाहता ही गाडी नियमित करण्याचा प्रस्ताव पाठवला असून, त्यावर सकारात्मक विचार झाला आहे.जूलैमध्ये ही गाडी सुरु होईल, अशी आशा आहे. जूलैपासून रेल्वेचे वेळापत्रक बदलते. त्यामुळे जूलैपासून ही गाडी सुरु करण्याचा प्रयत्नात आहे.
आनंदराव अडसूळ, खासदार.
बातम्या आणखी आहेत...