आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारथी दुकान चोरी : ‘तो’ शर्ट ठरणार मुख्य सुगावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शुक्रवारी मध्यरात्री शहरातील सारथी साडीजमध्ये चोरट्यांनी सहा लाख ३३ हजारांची चोरी केली. या वेळी एका चोरट्याने स्वत:च्या अंगातील शर्ट दुकानातच एका कोपऱ्यात टाकले होते. ते शनिवारी दुपारी आढळून आले.
हे शर्ट पोलिसांसाठी आता मुख्य सुगावा ठरणार असून, याच आधारे श्वानाने जुना मोटर स्टँडपर्यंत धाव घेतली होती. पुढे मात्र श्वान गेला नाही. याचाच अर्थ त्या ठिकाणाहून चोरटे वाहनाने पुढे गेले आहेत. या ठिकाणी चोरट्यांनी स्वत:चे वाहन उभे केले होते का? किंवा याच ठिकाणाहून पहाटे साडेपाच वाजतापासून खासगी बस सेवा सुरू होते, त्यामधून चोरट्यांनी पळ काढला का, याचा शोध पोलिस घेत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.