आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसस्थानकातील खड्डे अजूनही ‘जैसे थे’च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महाराष्ट्रराज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती आगारातील अंतर्गत रस्त्यासंदर्भात दै. दिव्य मराठीने ‘बसस्थानक गेले खड्ड्यात’ हे वृत्त २३ जून रोजी प्रकाशित केले होते. पुढील आठ दिवसांत हे काम केले जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र, आठ दिवसांचा कालावधी लोटूनही स्थानकातील खड्डे ‘जैसे थे’ असल्याचे चित्र अमरावती आगारात बघायला मिळत आहे.
दिव्य मराठी पाठपुरावा
अमरावती आगारात दररोज हजारांहून अधिक वाहनांचे आवागमन होते. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वेळच मिळत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रात्री काम केले, तर स्थानकावर बस वाहनाची पार्किंग असल्यामुळे हे काम होत नाही. दर दिवसा प्रवाशांसह वाहनांची वर्दळ असल्यामुळे हे काम रखडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकदा राजापेठ बसस्थानक सुरू झाले, तर मध्यवर्ती बसस्थानकाच्या अंतर्गत रस्त्याचे काम करण्यास सोईस्कर होईल. येथील पार्किंग राजापेठ येथे हलवता येईल. एकदा संपूर्ण रस्ता मोकळा झाला, तर लगेच हे काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.
ऑक्टोबरपर्यंतपुर्ण होईल काम
यारस्त्यांसंदर्भात टेंडरदेखील काढले आहे. नवीन बसस्थानक सुरू होईल, याच्या नादात येथील स्थानकाचे काम रखडले आहे. दिवसभर प्रवाशांसह बस फेऱ्यांची वर्दळ असल्यामुळे कामात व्यत्यय येतो. रात्रीच्या सुमारास गाड्या पार्किंग असल्यामुळे काम होत नाही. परंतु, आता पर्यायी व्यवस्था करून स्थानकातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल. साधारणत: ऑक्टोबरपर्यंत हे काम पुर्ण होईल, अशी माहिती विभागीय अभियंता खांडेकर यांनी िदली.
आठ दिवसांचा कालावधी लोटूनही कार्यवाही शून्य
महाराष्ट्रराज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती आगारातील अंतर्गत रस्त्यासंदर्भात दै. दिव्य मराठीने ‘बसस्थानक गेले खड्ड्यात’ हे वृत्त २३ जून रोजी प्रकाशित केले होते. पुढील आठ दिवसांत हे काम केले जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र, आठ दिवसांचा कालावधी लोटूनही स्थानकातील खड्डे ‘जैसे थे’ असल्याचे चित्र अमरावती आगारात बघायला मिळत आहे.
दरम्यान, ज्यावेळी वृत्त प्रकाशित केले होते, तेव्हा दमदार पावसामुळे येथील खड्डे पूर्णपणे भरले होते. या भरलेल्या खड्यातील पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत होते, तर हे खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक किरकोळ अपघात झाल्याचेही प्रसंग घडले होते. सध्या पाऊस जरी सुरू नसला, तरी मान्सूनला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा प्रवाशांना पुन्हा या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. परंतु, प्रवाशांसह वाहनांची वर्दळ अधिक असल्याने येथील डांबरीकरणाचे काम रखडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राजापेठ येथील बसस्थानक सुरू झाले, तर येथे काम करण्यास वेळ मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, राजापेठ येथील बसस्थानक सुरू होईल किंवा नाही, पण पर्यायी व्यवस्था करून ऑक्टोबरपर्यंत येथील रस्त्याचे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.तोपर्यत प्रवाशांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.
मध्यवर्ती बसस्थानकावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी,कर्मचारी त्रस्त झाले आहेत.