आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टायगर कॉरिडॉर’साठी अमरावती टीमची मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मेळघाट ते चोपडा या सातपुड्यातील भागात ‘टायगर कॉरिडॉर’ करण्यासाठी अमरावतीच्या वन्यजीव टीमची मदत घेतली जात आहे. वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी यासाठी खास पुढाकार घेतला आहे. व्याघ्र संचाराचा शोध घेण्यासाठी अमरावती येथील मानद वन्यजीव संरक्षकांचे पथक नुकतेच भुसावळ येथे गेले होते.

वढोदा वनक्षेत्रातील चारठाणा आाणि डोलारखेडा जंगलांतील जैवविविधतेचा या पथकाने अभ्यास केला. पथकात अमरावतीचे मानद वन्यजीव संरक्षक जयंत वडतकर, वन्यजीव संरक्षण संस्था, सातपुडा बचाव कृती समिती सदस्यांचा समावेश होता. 13 ते 15 नोव्हेंबर या काळात पथकाने वढोदा परिसराची पाहणी केली. त्यात पथकाला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर सातपुडा पर्वतरांगांच्या पठारावर वाघांच्या पायांचे ठसे आढळले. हे ठसे अगदी ताजे होते. त्यामुळे या भागात वाघांची संख्या जास्त असल्याचे बोलले जात आहे. या प्रक्रियेचे वन्यजीवप्रेमी व अभ्यासकांनी स्वागत केले आहे.

अनेक पक्षी आढळले
वढोदाच्या क्षेत्रात वन्यजीव पथकाला युरोपियन रोलर, नीलकंठ, कृष्ण-गरुड, ठिबकेवाला बदक, रातवा, राखी बगळा, नील चिमणी, नाचण, कोतवाल हे पक्षी आढळले. शिवाय अस्वल, बिबटे यांच्या पायांचे ठसेही पठारावर नोंदले गेले आहेत.

निसर्गरम्य परिसर
मेळघाटसारखीच जैवविविधता वढोदा येथे आहे. येथील पट्टेदार वाघांचा संचार मध्य प्रदेशापर्यंतही आहे. येथे वाघ असूही शकतात. समुद्रसपाटीपासून हा परिसर 532 मीटर उंचीवर आहे. येथील वाघांच्या पायांचे ठसे ताजे असेच आहेत. हा कुतूहलाचा विषय आहे. जयंत वडतकर, मानद वन्यजीव संरक्षक