आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या युवा मांडवाला लोकनृत्यांचा बहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- इंद्रधनुष्ययुवा महोत्सवात तिस-या दिवशी मुख्य रंगमंचावर सकाळच्या सत्रात लोकनृत्यांचे सादरीकरण झाले. चौदा विद्यापीठांच्या संघांनी उत्कृष्ट नृत्यप्रकार सादर करून रसिकश्रोत्यांची वाहवा मिळवली.
मुंबई विद्यापीठाच्या संघाने ‘ढोल नाचाचे... पयलं नमिन माझं रं गणपती देवाला’ या गीतावर नृत्य केले. मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कलाकारांनी हरियानवी नृत्य सादर केले. त्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे पावरा नृत्य, रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कलावंतांनी आदिवासी नृत्य, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरतर्फे कोळीनृत्य, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे ‘आईचा जाेगवा’, सोलापूर विद्यापीठातर्फे काठी नृत्य सादर करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कलाकारांनी पावरा नृत्य; एसआरटी मराठवाडा विद्यापीठ नांदेडतर्फे हरियानवी खोडिया; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादतर्फे पावरा; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकतर्फे तारपा; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे कोळी नृत्य, त्यानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या चमूने सादरीकरण केले. मोहन बोडे, रवींद्र हरदास डॉ. प्रफुल्ल गवई यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
अन्प्रत्येक क्षण फुलतच गेला
मराठमोळीवेशभूषा, भारतीय ग्रामीण, आदिवासी संस्कृती, सण उत्सव धार्मिक परंपरांचे दर्शन विविध विद्यापीठांतील संघांनी घडवले. भरपूर तयारीनिशी रंगमंचावर येणारे कलाकार टाळ्या घेऊन जात होते. अंबाबाईचा जोगवा, कोळी बांधवांचे नारळी पौर्णिमेला होणारे नृत्य, आदिवासी बांधवांचे काठी नृत्य यांसह एकूणच सादरीकरणाला मुख्य रंगमंचावरील प्रत्येक क्षण फुलत गेला.