आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati University,Latest News In Divya Marathi

पुनर्मूल्यांकनाला सहकार्य करण्याचे दिले आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी- अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकीच्या पुनर्मूल्यांकनाचे काम मंदगतीने सुरू आहे. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्तमालिका प्रकाशित केली आहे. त्यामुळेच विद्यापीठाने गुरुवारी (दि. 22) अमरावती विभागातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक बोलावली होती. मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनाला प्राध्यापक सहकार्य करतील, असे आश्वासन बैठकीला उपस्थित प्राचार्यांनी विद्यापीठाला दिलेत.
पुनर्मूल्यांकनाला प्राध्यापक अपेक्षित संख्येने हजर राहत नाहीत. त्यामुळेच पुनर्मूल्यांकनाची गती अतिशय मंदावली आहे. त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होतो. उन्हाळी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच हा निकाल विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित असते. मात्र, अनेक प्राध्यापक पुनर्मूल्यांकनाला पाठ फिरवतात. प्राध्यापकांपुढे विद्यापीठसुद्धा हतबल झाले आहे. त्यामुळेच गुरुवारी प्राचार्यांची बैठक बोलावली. पुढील काळात पुनर्मूल्यांकन आणि मूल्यांकनाला प्राध्यापक अपेक्षित संख्येने उपस्थित राहतील; तसेच नियोजित वेळेत निकाल लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही प्राचार्यांनी सांगितले. तसेच विभागात सध्या एकच मूल्यांकन केंद्र आहे. ही संख्या चार ते पाच होणे आवश्यक असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. अनेक प्राध्यापक वारंवार बोलवूनही पुनर्मूल्यांकनाला येत नाहीत, अशा प्राध्यापकांवर कारवाई करण्याचे अधिकार विद्यापीठाला नाही, अशा प्रकरणी संबंधित प्राध्यापकांविरुद्ध प्राचार्यांनी कारवाई करावी, असेही बैठकीमध्ये सांगण्यात आले आहे.
________________