आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सांघिक ओव्हरऑल प्रकारात केली एकूण सहा पदकांची कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राज्यशालेय धनुर्विद्या संघाचे प्रतिनिधित्व करणारा अंबानगरीचा गुणी धनुर्धर यशदीप भोगेने पुन्हा एकदा कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवताना गुवाहाटी (आसाम) येथे २१ जानेवारीपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत अचूक तिरंदाजीसह दोन सुवर्ण एकूण सहा पदकांची कमाई केली.

यशदीप हा समर्थ धनुर्विद्या अकादमीचा धनुर्धर असून, प्रशिक्षक गणेश िवश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनात तो नियमितपणे सराव करीत असतो. त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत भरघोस यश मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती.

यशदीपने सांघिकक प्रकारात लक्ष्यावर अचूक बाण सोडून सर्वाधिक ३,७२४ गुणांसह सोनेरी पदक जिंकले. या प्रकारात राज्य संघात यशदीपसोबत आणखी दोन सहकारी होते. त्यानंतर ओव्हरऑल प्रकारातही दमदार कामगिरी करून त्याने अव्वल स्थान पटकावले. ३० मी. प्रकारात मात्र भोगेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ५०, ६० आणि ७० मी. प्रकारात त्याचे सुवर्णपदक अगदी थोडक्यात हुकले. त्याला रौप्यपदक मिळाले.

यशदीपने यशाचे श्रेय वडील संजय भोगे, राज्य धनुर्विद्या संघटना अध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर, क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, जिल्‍हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आणि प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा यांना दिले आहे.

अमरावतीच्या धनुर्धराने सांघिकक ओव्हरऑल प्रकारात राष्ट्रीय शालेय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करताना सर्वाधिक गुणांची कमाई केली. सांघिकक प्रकारात महाराष्ट्राने एकूण ३,७२४ गुणांची कमाई केली. यात यशदीपचे १,२६८ गुण होते. त्यानंतर ओव्हरऑल या वैयक्तिक प्रकारातही त्याने दणकेबाज कामगिरी करून बाजी मारली. १,४४० पैकी भोगेने १,२६८ गुणांची नोंद करून सोनेरी पदक िजंकले.