आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amrvati University News In Marathi, Recruitment, Multinational Companies

अमरावती विद्यापीठाचा पदवीधर असाल , तर कंपन्यांत नोकरी इम्पॉसिबल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अभ्यासक्रमांचा सुमार दर्जा, कॅरीऑन, बातम्यांमधून उघड झालेली वस्तुस्थिती; अशा विविध कारणांमुळे सात नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या नोकर भरतीच्या यादीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्या ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकल्या असून, आतापर्यंत विद्यापीठाच्या पाचशेवर पदवीधारकांना ‘नो व्हॅकेन्सी’चा संदेश दिला आहे.पुणे-मुंबईकडील विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचे पॅकेज देणार्‍या या कंपन्यांनी पदवीधारकांना दरमहा आठ ते दहा हजार रुपयांचीही नोकरी देण्यास चक्क नकार दिला आहे. या कंपन्यांनी राज्यभरातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांचा दर्जा, शिकवण्याची पद्धत, कॅरीऑन, शिकवणारे मनुष्यबळ, कॉलेजेसची स्थिती, प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, मूल्यमापनाची पद्धत आदी वेगवेगळ्या मुद्दय़ांवर व्यापक सर्वेक्षण केले. त्या वेळी त्यांना अमरावती विद्यापीठाशी संलग्न अनेक कॉलेजसमध्ये पूर्णवेळ प्राचार्य नाहीत, अँप्रूव्ह्ड शिक्षकच नाहीत, अभ्यासक्रमांचा दर्जा तुलनेत अत्यंत सुमार आहे. कॅरीऑनमुळे प्रथम वर्षाचा विद्यार्थीही थेट फायनलपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे हुशार आणि कमकुवत दोन्ही विद्यार्थी एकाच रांगेत बसवले जातात, असे कंपन्यांना आढळले आहे. विद्यापीठाच्या मूल्यमापनाची पद्धतही चुकीची व दोषपूर्ण असल्याचा निष्कर्ष या कंपन्यांच्या एचआर-अँडमिन विभागांनी काढला आहे. परिणामी, मुलाखतीसाठी येणार्‍या विद्यार्थ्याजवळ अमरावती विद्यापीठाची पदवी दिसली, की मुलाखतकारांनी तोंड वाकडे करण्यास सुरूवात केली आहे.


कंपन्यांच्या सर्वेक्षणाचा आधार
0 बहुराष्ट्रीय कंपन्यांनी राज्यभरातील सर्व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांचा, पाठय़पुस्तकांचा आढावा घेतला. त्या आधारे गुणांकन करण्यात आले. अमरावती विद्यापीठाचे गुणांकन -36 आहे.
0 प्रसार माध्यमांमधून येणार्‍या सहा महिन्यांच्या बातम्यांची कात्रणे गोळा करण्यात आली. त्यालाही गुणांकन देण्यात आले. त्यातही विद्यापीठाचे गुणांकन -28 निघाले.
0 इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, सायन्स, आर्ट्स, कॉर्मस, बीबीए, बीसीए, एमसीए, बीसीए अशा शाखांच्या कॉलेजेसमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक शिकवतात, की सीएचबी प्राध्यापक, तज्ज्ञ अनुभवी की नवशिके! त्यातही कंपन्यांना नवशिके आणि अपूर्ण ज्ञान असलेले व्यक्तीच शिकवत असल्याचे आढळले. त्यामुळे अमरावती विद्यापीठाचे गुणांकन -15 वर गेले.
0 राज्यभरातील विद्यापीठांजवळ उपलब्ध अभ्यासक्रमांची यादी तयार करण्यात आली. त्यात अमरावती विद्यापीठात इतरत्र उपलब्ध असलेल्यांपैकी 18 अभ्यासक्रमच नाहीत, असे आढळले आहे.


कला शाखेलाही नोकर्‍या नाहीत
कला शाखेतून पदवी, पदव्युत्तर पदवी संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांनाही विद्यापीठाच्या कारभारामुळे नोकर्‍या मिळेनाशा झाल्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांत तर सोडा, या विद्यार्थ्यांना मुंबई, पुण्यातील बीपीओ कंपन्यांनीही जागा उपलब्ध नसल्याचे गोड कारण नमूद करत नकार कळवला आहे.


पीजीमुळे मिळाली नोकरी
मी अमरावती विद्यापीठातून इंजिनीअरिंग केले. तिसर्‍या वर्षात आल्यावरच माहिती झालं होतं, की विद्यापीठाच्या पदवीला बाहेर कवडीचीही किंमत नाही म्हणून. अखेर पुण्यात गेलो. तिथे प्रवेश मिळवला. पदव्युत्तर पदवी घेतली. आज चांगल्या पदावर आहे. अमरावती विद्यापीठाच्या पदवीच्या भरवशावर असतो, तर काय झाले असते कुणास ठाऊक! वैष्णव कडू, अमरावतीचा विद्यार्थी


विद्यापीठाची प्रतिमा खराब
आम्ही व्यापक सर्वेक्षण केले. त्या वेळी अमरावती विद्यापीठाची प्रतिमा चांगली नसल्याचे आम्हाला आढळले. या पदवीधरांची मागणी जागतिक बाजारपेठेत ‘मायनस’मध्ये आहे. विद्यापीठ प्रशासनालाच आपल्या कोर्सेस आणि विद्यार्थ्यांची चिंता नाहीये, मग कंपन्यांनी नोकर्‍या नाकारल्या तर त्यांचा काय दोष? स्पध्रेचे युग आहे. सर्वांना ‘द बेस्ट’ हवे आहे. जी. रामकृष्ण, एचआरडी कन्सल्टंट, बंगरूळू


जुनाट अभ्यासक्रमाचा फटका
आम्ही अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कन्सल्टंट आहोत. महाराष्ट्रातून अमरावती विद्यापीठाचा क्रमांक सर्वांत तळाशी आहे. त्यापेक्षा मुक्त विद्यापीठांचे अभ्यासक्रम चांगले. प्रश्नपत्रिका चांगल्या आहेत. मूल्यमापनाची पद्धतही खूपच चांगली आहे. अमरावतीचे मुलं आली, की त्यांच्याजवळ गुणपत्रिकाच इतक्या असतात, की त्या बघताबघता डोळेही थकतात. तिथल्या गोल्ड मेडललाही अर्थ नाही. जे. ए. प्रभाकर, आयटी कंपन्यांचे कन्सल्टंट, पुणे