आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anganwadi Building Construction Pending In Amravati

235 अंगणवाड्यांचे बांधकाम रखडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - जिल्ह्यातील विविध भागांतील 235 अंगणवाड्यांचे बांधकाम रखडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विविध योजनांच्या माध्यमातून अंगणवाड्यांचे बांधकाम करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी निधीदेखील मंजूर करण्यात आला. मात्र, संबंधित विभागाला निधीच मिळाला नसल्याची माहिती आहे. जिल्हा नियोजन समितीकडून अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेला एकूण सहा कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

महिला व बाल कल्याण विभागाला अंगणवाड्यांचे बांधकाम करता यावे म्हणून संबंधित विभागाच्या खात्यामध्ये निधी टाकलाच नसल्याची बाब समोर आली.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली, मात्र कोणताही निर्णय याबाबत घेण्यात आला नाही. भागात अंगणवाडी असावी असे असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. 2013-14 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा नियोजन समितीकडून महिला व बाल कल्याण विभागाला 27 ऑगस्टअखेर सहा कोटी 40 लाख रुपये ऐवढे अनुदान प्राप्त झाले आहे.

केवळ चर्चा
अंगणवाड्यांचे बांधकाम करण्याबाबतचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. जिल्हा परिषदांच्या सभांमध्ये केवळ चर्चा होत आहे. बांधकाम रखडल्याने भाड्यांच्या इमारतीत अंगणवाडी भरते.