आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सरकारचं करायचं काय; अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी दुमदुमले शहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अंगणवाडी कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी ‘जेल भरो’ आंदोलन केले. अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा, सेविकांना 10 हजार व मदतानिसांना साडेसात हजार रुपये मानधन देण्यात यावे आदी मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार हजारांवर अंगणवाडी कर्मचार्‍यांनी धरणे आंदोलन केले. यानंतर ‘जेल भरो’ करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व बी. के. जाधव यांनी केले.

सेविकांचा उत्साह : दिवसभर धरणे आंदोलन व घोषणा देऊनही सेविकांचा उत्साह तसूभरही ढळला नाही. अनेक सेविका आपली चिमुकली मुले घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मुंबई येथे शासनाशी सुरू असलेल्या चर्चेची काहीच माहिती मिळत नसल्याचे पाहून काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. अंगणवाडी सेविकांनी आंदोलक नेते व पोलिस अधिकार्‍यांच्या आदेशाचे पालन करीत कमालीचा संयम पाळला.

दरम्यान, पोलिसांनी अकराशे महिला कर्मचार्‍यांना अटक करून त्यांची सुटका केली.