आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा कांदा लावणार खिशाला खार, डोळ्यांना धार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चढ्या दराच्या आशेने यावर्षी शेतकºयांनीच विक्री थांबवल्याने व अतिवृष्टी व गारपिटीच्या नुकसानामुळे उत्पादनावर झाल्याच्या परिणामामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 1) बाजारात कांद्याचे दर 1800 ते 2000 रुपयांवर गेले असून, किरकोळ बाजारात कांद्याला 25 ते 30 रुपये दर मिळत आहेत.

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मागील वर्षी कांद्याचे दर सहा हजार रुपयांवर गेले होते. याचा सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्रात बसल्यामुळे कांदा उत्पादनात प्रचंड घट होऊन कांद्याचे दर सहा ते सात हजारांवर पोहोचले होते. परंतु जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन चांगले झाले होते. शेतकºयांना जागेवरूनच 600 ते 800 रुपये दर मिळाल्याने बहुसंख्य शेतकºयांनी कांदा शेतातूनच विकून टाकला होता.

व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात साठवणूक करून भाव वाढल्यानंतर कांदा बाजारात आणला होता. याचाच परिणाम किरकोळ भावावर होऊन भाव 80 रुपये प्रती किलोवर पोहोचले होते. यावर्षीच्या हंगामातही गारपीट व अतिवृष्टीचा फटका पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील कांदा उत्पादकांना बसला आहे; परंतु मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन जिल्ह्यात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक करून ठेवली आहे. दरम्यान, मंगळवारी येथील कृषिउत्पन्न बाजार समितीतही कांद्याची आवक कमी झाली आहे. एरव्ही बाजारात दररोज सरासरी 300 क्विंटल कांद्याची आवक होत असते. परंतु सध्या बाजारात केवळ 100 क्विंटल कांद्याची आवक होत आहे. दरम्यान, मंगळवारी कांद्याला 2,000 ते 2,200 रुपये भाव मिळाला.

अमरावतीत कांदा 2,000 रुपये : पाऊस येण्यापूर्वीच कांद्याच्या भावात सध्या तेजी असल्यामुळे कांद्याचे झालेले नुकसान व घटलेल्या उत्पादनामुळे ही तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकºयांनी कांदा साठवून ठेवल्यामुळे बाजारात आवकही मर्यादित आहे. मंगळवारी बाजारात केवळ 100 क्विंटल कांद्याची आवक झाली.
ठोक बाजारातही कांद्याचे चढले दर
- गारपिटीमुळे जिल्ह्यातही कांद्याचे उत्पादन घटले आहे. याचा परिणाम सुरुवातीपासून कांद्याच्या भावात तेजी येण्यावर झाला आहे. ठोक बाजारातही कांद्याला चढे दर असल्यामुळे शेतकºयांकडून ते जागेवरच 1500 ते 1700 रुपये दराने खरेदी केला जातो आहे. परंतु शेतकरी कांदा विकण्याच्या मन:स्थितीत दिसून येत नाही. मकसूदभाई, व्यापारी