आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी आश्रमात लागणार अण्णाभाऊ साठेंचा पुतळा; पालिकेकडून हिरवी झेंडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- गांधी आश्रम भागात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा लावण्यास महापालिकेकडून बुधवारी हिरवी झेंडी देण्यात आली.

आमदार रावसाहेब शेखावत यांच्या उपस्थितीतील बैठकीत मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांनी याबाबत सहायक संचालक नगर रचना विभागाला सूचना दिल्या. अण्णाभाऊ साठे पुतळा निर्माण समितीने बुधवारी मनपा आयुक्तांची भेट घेऊन गांधी आर्शमातील सार्वजनिक वापराच्या खुल्या जागेवर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यास अनुमती देण्याची मागणी केली.
आमदार शेखावत व महापौर वंदना कंगाले यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या मागणीला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सार्वजनिक हिताला, सुव्यवस्थेला व सामाजिक शांतता अबाधित ठेवत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला यामुळे कोणताही अडथळा येणार नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या वेळी माजी महापौर विलास इंगोले, मनोज भेले, सुरेश स्वर्गे, गांधी आर्शम येथील नागरिक रमेश गायकवाड, नाना थोरात, अमोल थोरात, अजय डहाके, अशोक खंडारे, आकाश साठे, रमेश चांदणे, भारत आमरे, अजय गवई, श्याम आमरे, नाना थोरात, योगेश तायडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.