आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arrivals Of Eleven Thousand Bags On The Market And Decamp

बाजारात तुरीच्या अकरा हजारांवर पोत्यांची आवक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-तुरीचा हंगाम जोरात सुरू असून, कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढली आहे. मात्र, अद्यापही भाव हमीभावाच्या खाली मिळत आहे. मंगळवारी 11 हजार 838 पोते शेतकर्‍यांनी आणले. तुरीला किमान 3400 तर कमाल 4175 रुपये भाव मिळाला. हरभर्‍याचे भावही हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
तुरीच्या हंगामाला सध्या जोरात सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. परंतु, हमीभाव 4300 रुपये असताना शेतकर्‍यांना नाईलाजाने हमीभावापेक्षा कमी दराने तूर विकावी लागत आहे. शासनाने सर्व बाजार समित्यांमध्ये शासकीय खरेदी सुरू केली आहे. परंतु, जाचक अटी व विलंबाने मिळणार्‍या पैशांमुळे शेतकर्‍यांनी या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजारात आज हरभर्‍याच्या 252 पोत्यांची आवक झाली. भाव किमान 2500, तर कमाल 2800 रुपये मिळाला. जाकी जातीच्या हरभर्‍याला सर्वाधिक 2950 दर मिळाला.