आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूच्या फुलांनी बहरले अमरावती शहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते र्शी र्शी रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सायन्सकोर मैदानावर पार पडलेल्या महासत्संग सोहळ्यासाठी थेट बंगळुरू येथून विविध जातींची एक लाखांहून अधिक फुले व आकर्षक दिवे अमरावतीत मागवण्यात आले होते. या फुलांमुळे शहर बहरले होते.

सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांसाठी आसन व्यवस्था व इतर आयोजनही नियोजनबद्ध व भव्य करण्यात आले होते. सायंस्कोर मैदानात तीन लाख नागरिक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली. त्यात तीन हजार व्हीआयपी आणि चार हजार व्हीव्हीआयपी मान्यवरांच्या व्यवस्थेचा समावेश होता.

महिनाभरापासून 60 हून अधिक लोक या महासत्संग सोहळ्यासाठी पर्शिम घेत होते. विविध जिल्ह्यांतून नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. विदर्भातील गावागावांतून दीड हजार स्वयंसेवक नियोजनात गुंतले होते. काही अनुयायी तीन दिवसांपासून शहरात दाखल झाले होते. मंगळवारी सकाळपासून 500 फुटांचा वॉकिंग रॅम्प आणि तीन हजार चौरस फुटांचा मंच सजवण्याचे काम सुरू होते. मैदानात 80 चौरस फुटाच्या चार एलईडी लावण्यात आल्याने भाविकांची सोय झाली. त्यामुळे प्रत्येक दर्शकाला हे आयोजन आकर्षित करणारे ठरले. विदर्भातील पारंपरिक खाद्यपदार्थ, आयुर्वेदिक औषधे, पंचधातूच्या वस्तू, श्री श्री रविशंकर यांची पुस्तके यासारख्या विविध वस्तूंचे स्टॉल मैदानात उभारण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी साकारण्यात आलेली फुलांची आरास पाहण्यासाठी अमरावतीकरांची कार्यक्रमापूर्वीच लगबग सुरू होती.

श्री श्री यांची रांगोळी ठरली आकर्षक
आंतरराष्ट्रीय रांगोळी कलावंत श्याम विसपुते यांनी र्शी र्शी रविशंकर यांची आकर्षक रांगोळी मंचासमोर रेखाटली होती. मान्यवरांसह अनेक नागरिकांना या रांगोळीने मोहिनीच घातली. विसपुते यांनी मंगळवारी दिवसभर या रांगोळीसाठी पर्शिम घेतले.