आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलेचा खून करणारा आसाराम अखेर गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पाच दिवसांपूर्वी रागाच्या भरात महिलेचा चाकूने खून करून फरार झालेल्या आरोपीला ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मालठाण येथून अटक केली आहे. आसाराम विठोबा तायडे (४१, लवादा, ता. धारणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आसाराम याने २८ मेच्या पूर्वसंध्येला धारणी तालुक्यातील मोहीफाटा वझ्झर येथील सुमन शेलोकार हिचा खून करून पसार झाला होता.
आरोपी आसाराम हा वझ्झर येथील धरणावर चौकीदाराचे काम करीत होता. त्याचठिकाणी फिर्यादीची पत्नी सुमन ही मोलमजुरीचे काम करत होती. तेव्हापासूनच दोघांची आेळखी झाली होती. त्यानंतर शुल्लक कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादाचा वचपा काढण्यासाठी रागाच्या भरात आसारामने २८ मे रोजी सायंकाळी फिर्यादी रामचंद्र शेलोकार यांच्या घरी जाऊन पत्नी सुमनचा खून करून पसार झाला. याप्रकरणी फिर्यादी रामचंद्र शेलोकार यांनी परतवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. तेव्हापासून परतवाडा पोलिस अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या मागावर होते.
३० मे रोजी पोलिसांना आसाराम हा पुणे जिल्यातील दौंड येथील मौजा मालठाण येथे आपल्या नातेवाईकाकडे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरुन आरोपीला अटक करण्यात आली. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक एस. व्ही. हिरडेकर, परतवाडाचे ठाणेदार बोबडे, सहाय्यक निरीक्षक नागेश चतरकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक फुंदे, मेटे, सचिन मिश्रा, सुनील अश्विन मानकर यांनी संयुक्तपणे केली.