आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Election Preparations,latest News In Divya Marathi

नकली नोट... ‘नो टेन्शन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- तुम्हीबँकेत कॅश भरण्यासाठी गेले असता, कॅशियरला त्यात बनावट नोट आढळल्यास आता ‘नो टेन्शन’. कारण ग्राहकाच्या नोटांमध्ये अनावधानाने आलेल्या बनावट नोटांचा भुर्दंड ग्राहकाला देण्याचे सक्त आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन करता आजही काही बँका ग्राहकांना नकली नोटा जमा करायला लावून दुसऱ्या नोटा घेतात, तोवर रोख जमा करून घेणार नाही, असे सांगत आहेत, जे पूर्णपणे चुकीचे नियमबाह्य आहे.
पूर्वी कोणत्याही नोटांच्या गड्डीत अशी बनावट नोट आढळली, तर कॅशियर एक तर ही नोट फाडून टाकत असे किंवा ग्राहकाला दुसरी नोट आणा, असे सांगत होते. आताही हिच पद्धत अनेक सरकारी खासगी बँकांमध्ये सुरू आहे. हाती आलेली नकली नोट टरकन फाडून कॅशियर मोकळा होतो. ग्राहकाला दुसरी नोट आणायला लावतो. यापुढे असे करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने त्यांच्या नोटिफिकेशन क्रमांक RBI/2013-14/87 No.DCM (FNVD) G-5/16.01.05/2013-14 नुसार दिले आहेत. अमरावतीमधील एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारात एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून हा तपशील मिळवला आहे.
कोणताही ग्राहक स्वत:हून रोख रकमेच्या गड्डीत बनावट नोट घालत नाही. अनावधानाने एखादी बनावट नोट निघते. त्यामुळे, या नोटेबद्दल रिझर्व्ह बँकेचे काय नियम आहेत, अशी विचारणा माहिती अधिकारात तपशील मागवणाऱ्या व्यक्तीने आपल्या अर्जात केली होती. त्यानुसार, कोणत्याही गड्डीत बनावट नोट आढळल्यास ती नोट फाडण्याचे अधिकार कॅशियर, बँक मॅनेजर किंवा अन्य काेणत्याही अधिकाऱ्यास नाही, असे राष्ट्रीयीकृत बँकांनी दिलेल्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता तुमच्या रोखेच्या गड्डीत बनावट नोट आढळली, तर टेन्शन घेऊ नका. त्या नोटेची रितसर पोलिसांत तक्रार करण्याची जबाबदारी ही बँकेची आहे, हे बँक कर्मचाऱ्यांना ठासून सांगा.

उत्सवांचा काळ संवेदनशील
उत्सवांच्याकाळात बनावट नोटा चलनात येण्याचा धोका जास्त असतो, असा बँकांचा अनुभव आहे. यामागील नेमकी कारणे आजही निष्पन्न झालेली नाहीत, परंतु बँक अधिकाऱ्यांना या काळात जास्त सतर्कतेचे आदेश दिले जातात.
असा आहे नियम
बनावट नोट आढळल्यास कॅशियरने याबाबत बँक मॅनेजरला सूचित करावे.
मॅनेजरने कॅशियरने नोटेच्या तपशिलासह पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करावी.
ज्या व्यक्तीच्या रोखेत ही नोट सापडली असेल, त्याला भुर्दंड म्हणून त्याच्या एकूण रकमेतून नोटेची रक्कम वजा केली जाऊ नये. अथवा त्याला दुसरी नोट आणण्याबाबत बाध्य केले जाऊ नये.