आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक तर लढणार, पण पक्ष मात्र अनिश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावतीकरांच्या हितासाठी विधानसभेची निवडणूक लढणार. मात्र, कोणत्या पक्षाकडून लढणार, याबद्दलची भूमिका शेवटच्या क्षणीच ठरेल, असे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी स्पष्ट केले. ‘अमरावतीचा विकास आणि सुनील देशमुख’ हे समीकरण लोकही मानतात. विकासाची दृष्टी असलेला नेता म्हणून देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे ते निवडणूक लढतील काय, याबाबत अमरावतीकरांना उत्सुकता लागली आहे.विधानसभेच्या आखाड्यात लढेलच. अमरावतीकरांसाठी विकासाच्या वाटा विस्तृत करायच्या आहेत. त्यासाठीच मैदानात उतरणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
ते भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा काही दिवसांपासून राजकीय वतरुळात आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, निवडणूक जवळ आली, की चर्चा, वावड्या, अफवा उडतातच. आपणास सध्या त्याबद्दल काहीच बोलायचे नाही. कोणत्या पक्षाकडून लढणार, हे योग्य वेळी स्पष्ट होईलच. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करताहेत. त्यामुळे दरदिवशी राजकीय परिस्थिती बदलत आहे. म्हणूनच कुणा पक्षाकडून लढायचे की अपक्ष, यावर सध्या आपले चिंतन सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले.