आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणधुमाळीमध्ये नेत्यांच्या दौ-याचा नागरिकांना त्रास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- निवडणुकीच्यारणधुमाळीत सुरू होणा-या नेत्यांच्या दौऱ्यांचा त्रास आगामी काळात अमरावतीकरांना सहन करावा लागणार आहे. आपापल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ विविध पक्षांचे मोठे नेते आगामी काळात अमरावतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्यासाठी काढण्यात येणारी फेरी, प्रचार सभा आदींसाठी अनेक व्हीआयपी, व्हीव्हीआयपी अमरावतीत येणार आहेत.

या अतिमहत्त्वाच्या लोकांच्या दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेत वेळोवेळी बदल करावा लागणार आहे. व्हीआयपी, व्हीव्हीआयपी लोकांच्या वाहनांचा ताफा ज्या रस्त्यावरून जाईल, जेथे त्यांच्या सभा असतील त्या मार्गांवरील वाहतूक थांबवणे, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणे, असे उपाय पोलिसांना करावे लागणार आहेत. त्याचा थेट फटका अमरावती शहरातील अनेक वाहनचालकांना बसणार आहे. निवडणूक काळात व्हीआयपींच्या दौऱ्यामुळे वाहतूक रोखून ठेवण्याच्या या घटनांना सोमवारपासून अमरावतीत सुरुवात झाली. काँग्रेसचे राज्यातील प्रचार प्रमुख नारायण राणे सोमवारी अमरावतीत होते. राणे ज्या ज्या मार्गांवरून अमरावतीत फिरले, ते सर्व मार्ग १० ते १५ मिनिटांपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. बेलोरा ते बडनेरा, बडनेरा ते संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, पंचवटी चौक, महािवतरण कार्यालय ते हॉटेल ग्रँड महफील या मार्गावरील वाहतूक पोलिसांना बंद करावी लागली होती. त्यामुळे आजपासून निवडणूक होईस्तोवर व्हीआयपींच्या वाहनांचा ताफा पुढे जाईस्तोवर थांबण्याची सवय लाऊन घ्या, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
लोकांपासूनच दूर पळतात
जेमतदार नेत्यांना निवडून देतात, त्यांच्यापासूनच या मंत्र्यांना सुरक्षा हवी असते. जे मतदार निवडून देतात. त्यांच्यापेक्षा मंत्र्यांना, व्हीआयपींना जास्त घाई असते. लोकशाहीत कोण महत्त्वाचे : लोक की राज्यकर्ते, हा एक प्रश्न आहे. अक्षयजामोदकर, नागरिक