आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपंग जनता दल स्वबळावर लढणार जिल्ह्यातील आठ जागा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अपंगजनता दलाने जिल्ह्यातील आठही मतदारसंघांमध्ये स्वबळावर सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. महायुती आघाडीमध्ये सर्वच पक्ष स्वबळाची भाषा करून स्वतंत्र निवडणूक लढण्याचा विचार करीत आहेत.
अपंग जनता दल, सामाजिक संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली. अपंग जनता दलचे नेते राजिक शाह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीतदेखील पक्षाने उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांना अपंग निराधार त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान करून चांगले मताधिक्य मिळाल्याचे शाह यांनी सांिगतले. तेव्हादेखील सामाजिक संस्थांचा पाठिंबा पक्षाला मिळालेला होता. त्याच पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आठही जागांवर उभे राहण्याचा पक्षाने निर्णय घेतल्याचे शाह यांनी सांगितले. या घोषणेनंतर कार्यकर्ते कामाला लागले आहोत.
प्रस्ताव झाला प्राप्त
जिल्ह्यातीलआठही मतदारसंघांतील इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तसा प्रस्तावही पक्षप्रमुखांना प्राप्त झाला आहे. अंतिम यादी प्रकाशित करण्यात येईल. मात्र, निवडणूक ही स्वबळावरच लढवणार. लोकसभा निवडणुकांमध्येही पक्षाने उमेदवार उभे केले होते. अमरावतीकरांनी याला चांगला प्रतिसाद दिला होता.