आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसप'च्या दोघांची घोषणा; तिघांचे शिक्कामोर्तब बाकी, समीकरण बदलण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आगामीविधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बहुजन समाज पक्षाकडून दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली असून, तिघांच्या नावावर केवळ शिक्कामोर्तब बाकी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बडनेरा, अमरावती अचलपूर मतदारसंघांसाठीची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. त्यांच्या नावांची घोषणा तेवढी बाकी आहे.
सहकार क्षेत्रात वरचष्मा असलेले जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढेपे यांनी बसपकडून धामणगावरेल्वे मतदारसंघातून रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रा. वीरेंद्र जगताप अभिजित ढेपे यांच्यादरम्यान मागील काही वर्षांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. काँग्रेस उमेदवाराला पराजित करण्यासाठी ढेपे बसपच्या हत्तीवर स्वार झाले असून, भाजपचे अरुण अडसड यांचेदेखील विद्यमान आमदारासमोर आव्हान राहणार आहे. अभिजित ढेपे यांच्या उमेदवारीनंतर धामणगावरेल्वे मतदारसंघातील जातीय समीकरण बदलणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. मात्र, बदलत्या समीकरणाचा लाभ ढेपे यांना मिळेल की, अडसड यांना. हे लवकरच स्पष्ट होणार आहे. काँग्रेसचे प्रा. वीरेंद्र जगताप, भाजपचे अरुण अडसड, बसपचे अभिजित ढेपे, जनता दलाचे पांडुरंग ढोले, मनसेचे ज्ञानेश्वर धाने पाटील, भाकपचे शरद सुरजुसे आदी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे. यामध्ये कोणाचे गणित कोण बिघडवेल, कोणाचे गणित कोण जमवेल हे तेवढेच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासह तिवसा मतदारसंघातील बसपचे उमेदवार संजय लव्हाळे प्रस्थापित उमेदवारांच्या नाकीनऊ आणण्यास कमी पडणार नाहीत. जातीय समीकरणाचा भक्कम आधार लव्हाळे यांना मिळेल, त्यामुळे विद्यमान आमदार महायुतीच्या उमेदवारालादेखील त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
धामणगावरेल्वे तिवसा मतदारसंघात बसपने तुल्यबळ उमेदवार दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासह अचलपूर, अमरावती बडनेरा मतदारसंघातील उमेदवारदेखील निश्चित झाले असून, केवळ त्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. अमरावती अचलपूर येथे पक्षाकडून मुस्लिम समाजातील उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरू आहे. असे झाल्यास मुस्लिम बहुजन समाज घटकांची साथ त्यांना मिळेल, असे राजकीय संकेत आहे. अमरावती येथून नईम अख्तर, अचलपूर येथून रफीक सेठ तर बडनेरातून रवींद्र वैद्य यांच्या नावांची चर्चा होत आहे. अचलपूर अमरावती येथील उमेदवारदेखील तुल्यबळ असल्याची माहिती आहे.