आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आघाडी तुटल्यानंतर तट्टे, बूबही राकाँच्या तंबूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- काँग्रेस सोबतची आघाडी तुटल्यानंतर सुरू झालेली उमेदवारांची शोधमोहीम राकाँने शनिवारी नामांकनाच्या शेवटच्या क्षणी पूर्ण केली. या धक्कादायक घटनाक्रमात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. साहेबराव तट्टे शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख दिनेश बूब राकाँत सहभागी झाले आहेत. काँग्रेसच्या माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वीच राकाँत प्रवेश घेत अचलपूरची उमेदवारी मिळवली आहे.
या दोघांसह राकाँने जिल्ह्यातील सात मतदारसंघांत स्वत:चे उमेदवार उभे केले असून, बडनेऱ्यात रवि राणा यांना पाठिंबा दिला आहे. प्रवेश घेताच प्रा. साहेबराव तट्टे यांनी तिवसा मतदारसंघातून, तर दिनेश बूब यांनी दर्यापूरमधून उमेदवारी दाखल केली. याशिवाय अमरावती मतदारसंघात डॉ. गणेश खारकर, मोर्शीत हर्षवर्धन देशमुख,अचलपुरातही माजी मंत्री वसुधा देशमुख, मेळघाटात राजकुमार पटेल, धामणगाव रेल्वेत चांदूररेल्वेचे माजी नगराध्यक्ष गणेश राय यांनी शनिवारी दुपारी राकाँची उमेदवारी दाखल केली.