आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

मतदाराविषयीच्या आक्षेपाला मोजा 2 रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मतदान केंद्रावर एखादा मतदार मतदान करण्यासाठी आला आहे. मात्र तो मतदार अमूक नावाचा नाही वा दुसऱ्यांच्या नावे मतदान करण्यासाठी मतदान करण्यास आला आहे, अशी शंका पोलिंग एंजटाला आल्यास त्याला संबंधित मतदारांवर आक्षेप नोंदवता येतो. मात्र त्याला रीतसर दोन रुपये मतदान केंद्राध्यक्षांकडे भरावे लागणार आहेत. अशी यंत्रणा सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध राहणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.
मतदार यादी अंतिम केल्यानंतर काही मतदारसंघातून बोगस मतदार असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बोगस मतदान होऊ नये, यासाठी आम्ही योग्य ती काळजी घेतली आहे. मतदान स्लिप वाटप करताना ज्या ठिकाणी मतदार नाहीत, अशी यादीही संबंधित मतदान केंद्रावर असणार आहे. मात्र तरीही अमूक मतदार दुसऱ्याच्या नावे मतदान करीत असल्याची शंका आल्यास दोन रुपये भरून त्याला आक्षेप घेता येतो. यावर मतदान केंद्राध्यक्ष तत्काळ संबंधित मतदारांच्या ओळखीची कागदपत्रे पाहून त्याची संक्षिप्त चौकशी करू शकतात. काही प्रकरणामध्ये नावाचा व्यक्ती बी नावाच्या व्यक्तीचे मतदान करून गेली आणि त्या ठिकाणी पुन्हा बी नावाचा व्यक्ती आली आणि त्याने मीच बी नावाचा व्यक्ती असल्याचे ओळखपत्रांच्या आधारे पटवून दिल्यास त्याला मतदान करण्याचा अधिकार देण्यात येतो. पण त्याचे मतदान मशिनऐवजी मतपत्रिकेवर शिक्का मारून घेता येते, असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. गेडाम यांनी सांगितले.
या क्रमांकावर करा तक्रार...
दोनदिवसांपूर्वीपासून होणाऱ्या घडामोडीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. मात्र तरीही कोठे अनुचित प्रकार मतदारांना प्रलोभने, आमिष दाखविण्याचा प्रकार होत असेल तर ०२१७ २६२०२२८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. गेडाम यांनी केले.
शहरात १३ दिवसांत ३६३ कॉर्नर सभा...
ते१३ ऑक्टोबर या १३ दिवसांच्या कालावधीत शहरामध्ये प्रत्येक पक्षाने प्रचाराचा धुरळा उडवला. यामध्ये १२ जाहीरसभा, ३३६ कॉर्नरसभा १७८ पदयात्रा झाल्या असल्याचे पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी सांगितले. शिवाय आचारसंहिता भंगाचे ३६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाय शहर-जिल्ह्यात कोटी ६९ लाख ८८ हजार ५३० रुपयांची रक्कम पकडण्यात आली.