आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

धामधूम संपली; धाकधूक सुरू, प्रशासन झाले सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मतदान संपण्याच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार बंद करावयाचा असल्याने आजचा शेवटचा दिवस (सोमवार) विविध पक्षांच्या फेरींनी गाजला. दरम्यान, सायंकाळनंतर गुप्त प्रचार मोहीम सुरू झाली असून, मतदान संपेपर्यंत सर्वच उमेदवारांतर्फे मतदारांना आकर्षित करणे सुरू राहणार आहे.
सोमवारी सायंकाळी सहा वाजतापासून जाहीर प्रचार तोफा थंडावल्या. त्यामुळे आजपर्यंत होणाऱ्या जाहीर सभा, कार्यकर्त्यांच्या फेरी, वाहनांच्या माध्यमातून सुरू असलेली जाहिरात या सर्व बाबी बंद झाल्या आहेत. परिणामी, मतदान सुरू होईपर्यंत आता केवळ आणि केवळ गुप्त प्रचार सुरू राहणार आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १२६ नुसार निवडणूक संपण्याच्या ४८ तास अगोदर जाहीर प्रचारावर बंदी आहे. त्यानुसार, जाहीर प्रचार मिरवणुका तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदान क्षेत्रात प्रचार करू नये, अशी अधिनियमात तरतूद आहे. दरम्यान, कुणीही या तरतुदींचा भंग केला, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे उपसचिव तथा राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी यांनी कळवले आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांमध्ये उमेदवारांना काेणताही जाहीर प्रचार करता येणार असून, साेशल साइट‌्सवरही प्रचारास बंदी आहे.
मेळघाटच्या पोलिंग पार्टीज् रवाना
मेळघाटमतदारसंघातील गावे अत्यंत दूर दुर्गम भागात आहेत. त्यामुळे तेथील पोलिंग पार्टीज् सोमवारी सायंकाळीच रवाना करण्यात आल्या. मी स्वत: रविवारी उशिरा रात्रीपर्यंत तेथे होतो. एकूणच व्यवस्थेचा आढावा या दौऱ्यादरम्यान घेण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील कामकाजाचे सनियंत्रण चोखपणे करण्यात आले आहे. किरणिगत्ते, मुख्यिनवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी