आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाच्या पूर्वसंध्येला, अफवांचा पाऊस, पाठिंबा दिल्याची अन् प्रचार थांबल्याची जोरदार चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वेगवेगळ्यानिवडणुकीमध्ये राजकीय सेंटिंगमुळे होणार चर्चेचे पडसाद विधानसभेसाठी होणा-या मतदानाच्या पूर्वसंध्येलाही जाणवले. सोशल मीडियाचे सक्षम माध्यमामुळे जिल्हाभर राजकीय सेटिंगची चर्चा जोरात होती. दिवसभर सुरू असलेल्या अफवांमुळे गणित बिघडू नये म्हणून उमेदवारांची मात्र पुरती धावपळ झाली. याबाबत ‘दिव्य मराठी’ने उमेदवारांशी संपर्क साधून अफवांबाबत विचारणा केली असता, त्यात काही तथ्य नसल्याची माहिती समोर लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसें यांनी जाहीर सभांमधून ‘अंदर की बात, शरद पवार हमारे साथ’ हा नारा दिला होता. त्यामुळे विरोधक गोंधळात पडले होते. विधान परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांनी भाजप सोबत हातमिळवणी केल्याचा आरोप केला. जिल्ह्याला राजकीय सेटलमेंटची पार्श्वभूमी असल्याने राजकीय अफवा जोरात पसरल्या. त्यामुळे जिभरात चांगलीच खळबळ उडाली होती. अफवा खरी किंवा खोटी याबाबत शहानिशा करण्यासाठी कार्यकर्ते आपल्या नेत्यांशी वा उमेदवाराशी संपर्क करून खात्री करुन घेत होते.