अमरावती-जिल्हाभरातील२३ लाख मतदार आज, बुधवारी लोकशाहीचा महाउत्सव साजरा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सकाळी सातच्या ठोक्याला लोकशाही बळकटीकरणाच्या महायज्ञास सुरुवात होणार असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे.
विदर्भातील ६० तथा राज्यातील २८८ मतदारसंघांसह जिल्ह्यातील धामणगावरेल्वे, बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर मोर्शी, या आठ मतदारसंघांसाठी आज मतदान होणार आहे. दोन हजार ५०९ मतदान केंद्रांवरुन जिल्हाभरातील २३ लाख मतदार या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतील. त्यासाठी, जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किरण िगत्ते यांच्या नेतृत्त्वात आठही मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी त्यांच्या अधिनस्थ यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे.
मतदारांसाठी हेल्पलाइन
लोकसभानिवडणुकीवेळी मतदान करता आले नाही, अशी अनेकांची तक्रार होती. प्रत्यक्षात एक हजार १३६ जणांनीच तक्रारी केल्या. या सर्वांना वारंवार आवाहन केले गेले. व्यक्तीश: फोन, मेसेजही करण्यात आले. तरीही केवळ १५१ नागरिकांनीच नावे नोंदवली. काहींना नावे शोधायची असल्यास ७०८३१०६९३०...३७ असे, सात फोन नंबर्स देण्यात आले आहेत. किरणिगत्ते,जिल्हा निवडणूकिनर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, अमरावती.