आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या फे-या रद्द; प्रवाशांचे हाल, 228 बसेस निवडणूक विभागाने घेतल्या प्रासंगिक करारावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यातीलआठ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने एसटी महामंडळाच्या २२८ बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. त्यामुळे बसगाड्यांचा तुटवडा भरून काढण्यासाठी ऐनवेळी अनेक मार्गावरील बसफे-या रद्द होणार असल्याने बुधवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठा गैरसोय होणार आहे.

एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात बसेस प्रासंगिक करारावर गेल्यामुळे बहुतांश बसफेऱ्या रद्द होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, कोणत्या आणि किती मार्गावरील बसफेऱ्या रद्द होणार याचे सध्या नियोजन झाले नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. या पाश्वर्श्वभूमीवर, प्रवाशांची गैरसोय होणार हे निश्चित असल्याने बुधवारी सहसा प्रवास टाळणेच योग्य राहील, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. अमरावती मतदारसंघात २९, बडनेरा २०, धारणी २८, मोर्शी २८, अचलपूर ३४, चांदूररेल्वे ३३, दर्यापूर ३० तिवसा २६, अशी एकूण २२८ वाहने व्यस्त राहणार आहेत. दरम्यान, १४ १५ अॉक्टोबरला या गाड्या निवडणूक विभागाच्या ताब्यात राहणार आहेत. कर्मचारी मतदान साहित्य केंद्रावर पोहचवणे मतदानानंतर परत सोडून देणे, यासाठी बसेसचा उपयोग करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पर्यायी व्यवस्था करणार
निवडणुकीसाठीजिल्ह्यातील बसेस प्रासंगिक करारावर जाणार असल्याने एसटीच्या काही फे-या रद्द होणार आहके. मात्र, सद्या वेळापत्रक ठरायचे आहे. मतदानाच्या दिवशी किती फेऱ्या रद्द होईल, याची संपूर्ण माहिती प्राप्त होईल. मात्र, प्रवाशांची गैरसोय होणार नाही, यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. आर.एन. पाटील, विभागीयवाहतूक अधिकारी.