आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा दिग्गजांचे नाही स्वत:लाचमतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यातीलआठ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या एकूण ३२ पैकी सहा उमेदवारांचे निवासस्थान एका ठिकाणी तर उमेदवारी दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळे त्यांना आपलेच मत आपल्याला देता येणार नाही. स्वत:चे मतदान स्वत:ला करू शकणाऱ्या दिग्गजांमध्ये रावसाहेब शेखावत, सुलभा खोडके, अभिजीत अडसूळ, दिनेश बूब, डॉ. गणेश खारकर आणि प्रफुल्ल पाटील यांचा समावेश आहे.
अमरावती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांच्यासह संपूर्ण शेखावत कुटुंबाचे मतदान बडनेरा मतदारसंघात आहे. त्यामुळे शेखावत कुटुंबातील एकाचेही मत रावसाहेबांना मिळू शकणार नाही. अमरावतीमधून राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले डॉ. गणेश खारकर यांचेही मतदान बडनेरा मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांनाही स्वत:चे मत देता येणार नाही.
बडनेरा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सुलभा खोडके यांच्याबाबतही अशीच स्थिती आहे. सुलभाताईंसह संपूर्ण खोडके कुटुंबाचे मतदान अमरावती विधानसभा मतदारसंघात आहेत. परिणामी खोडके कुटुंबातील देखील एकाचेही मत सुलभाताईंना मिळणार नाही. दर्यापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले शिवसेनेचे अभिजित अडसूळ यांचे नाव मुंबईतील डोंबिवली मतदारसंघाच्या यादीत आहे. याच मतदारसंघातून निवडणूक लढवणारे दिनेश बूब त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची नावे अमरावती मतदारसंघात आहेत. अचलपुरातून रिंगणात असलेले प्रफुल्ल पाटील यांचे नावही अमरावतीत आहे. त्यामुळे त्यांना स्वत:लाच मतदान करता येणार नाही.