आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणूकीच्‍या पार्श्वभूमीवर चार ऑगस्टला राष्ट्रवादीचा मेळावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर होत असलेल्या मेळाव्यांच्या शृंखलेत अमरावतीचा मेळावा सोमवारी (4 ऑगस्ट) होत असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील वर्‍हाडे यांनी बुधवारी (दि. 30) स्पष्ट केले. सांस्कृतिक भवनात भरणार्‍या या मेळाव्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उमुख्यमंत्री अजित पवार व इतर मान्यवरांसह विदर्भातील मंत्री, पक्षाचे निरीक्षक आणि जिल्ह्यातील विविध आघाड्यांचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता मेळावा सुरू होणार आहे. मेळाव्यात पक्षाची भूमिका, आघाडीत या पक्षाचे (राकाँचे) स्थान, आगामी निवडणुकीची रणनीती, मतदारसंघांची निश्चिती आदी सर्वच मुद्दय़ांचा उलगडा होणार आहे.
जिल्हाभरातील सर्व आघाडी व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थिती राहणार आहेत. पत्रकार परिषदेला वर्‍हाडे यांच्यासह शहराध्यक्ष नितीन हिवसे, शहर कार्याध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, ज्येष्ठ नेते तथा माजी पालकमंत्री हर्षवर्धन देशमुख, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी सुरेश कडू, प्रल्हाद सुंदरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मेघा हरणे, प्रदेश चिटणीस प्रदीप राऊत, जिल्हा बँकेचे संचालक सुभाष पावडे, नवनीत राणा, विजय लुंगे आदी उपस्थित होते. लुंगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याचा मनोदय व्यक्त केला. पक्ष प्रवेशाची अधिकृत घोषणा चार ऑगस्टच्या मेळाव्यातच केली जाणार आहे. मेळाव्यासाठी नेत्यांचे आगमन तीन ऑगस्टला रात्रीच होणार आहे. रात्री नऊपर्यंत सर्व अमरावतीत दाखल होणार आहेत.